भुर्इंज : छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात. शिवरायांनी सर्व जातीधर्मातील लोकांना सोबत घेऊन स्वराज्याचं स्वप्न साकारलं. अशा या महान राजाची जयंती किती वेळाही साजरी झाली तरी हरकत नाही, मात्र हेतू प्रामाणिक असला पाहिजे, ही सार्वत्रिक अपेक्षा असते. नेमक्या याच अपेक्षेप्रमाणे भुर्इंज येथील युवकांनी शिवज्योती आणून शिवजयंती साजरी करण्याऐवजी शिवाजी महाराजांच्या पदस्पदर्शाने पावन झालेल्या वैराटगडाच्या डागडुजीची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. विशेष कायमस्वरुपी राबवली जाणार आहे. शिवछत्रपतींवरील निष्ठेमुळे विशिष्ट ध्येयाने कार्यरत झालेल्या या युवकांचे हे कार्य म्हणजे आदर्श शिवभक्तीचे प्रतीक ठरावे.याबाबत विनोद भोसले या युवकाने सांगितले, आमच्या बालगणेश मंडळाने भुर्इंज गावात सर्वप्रथम शिवजयंती उत्सवाला प्रारंभ केला. आमची तिसरी पिढी आहे. गेल्या काही वर्षांपासून एकाच वर्षात तीन-तीन शिवजयंती साजऱ्या होत आहेत. अगदी दररोज छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर झाला तरी हरकत नाही. मात्र केवळ ज्योत आणून आणि ढोल ताशे वाजवून शिवजयंती साजरी केली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करणे या पारंपरिक समजाला छेद देऊन वेगळे काहीतरी करण्याचा मनोदय युवकांनी व्यक्त केला. त्यातूनच गडकिल्ल्याच्या संवर्धनाची कल्पना पुढे आली. गडाचे संवर्धन करायचे तर आपल्या शेजारीलच वैराटगडाचे संवर्धन करण्याचा निर्णय साऱ्या युवकांनी घेतला. त्याची अंमलबजावणी शिवजयंतीदिनी म्हणजेच सोमवार दि. २0 पासून या महत्वाकांक्षी उपक्रमाला सुरुवात होत आहे. (वार्ताहर)पायऱ्यांना शूरवीर मावळ्यांची नावेया मार्गातील प्रत्येक पायरीवर प्रेमवीरांनी लिहिलेली नावे खोडून त्या पायऱ्यांना शूरवीर मावळ््यांची नावे देण्यात येणार आहेत. गडाची स्वच्छता कायमस्वरुपी राहावी, यासाठी ठोस प्रयत्न केले जाणार आहेत. या कामात पहिल्या टप्प्यात ४0 ते ५0 युवक सहभागी होणार आहेत. अशी होणार कामेगडावरील पाच पाण्याच्या टाक्यांची स्वच्छतागडावर वृक्षारोपणतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पायरी मार्गाची डागडुजी
शिवरायांना वंदन प्रत्यक्ष कृतीतून
By admin | Updated: April 20, 2015 00:02 IST