शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उपाध्यक्षांसह सभापतींचा बंडाचा झेंडा!

By admin | Updated: January 18, 2016 23:33 IST

जिल्हा परिषदेत राजीनामा नाहीच : मार्चपर्यंत संधी देण्याबाबत पक्षाकडे पत्र

सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनंतर इतर पदाधिकारी सोमवारी राजीनामा देणार, असे पक्षाकडून ठामपणे सांगण्यात आले होते. मात्र, आता उपाध्यक्षांसह चौघा सभापतींनीही पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकाविला आहे. राजीनामा तर दिला नाहीच; उलट या पाचजणांनी पक्षाकडे पत्र दिले आहे. त्यामध्ये ३१ मार्चपर्यंत काम करण्याची संधी द्या, अन्यथा पदासह पक्षाचाही राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे सबकुछ राष्ट्रवादी अशी परिस्थिती आहे. पाच वर्षांच्या काळातील शेवटच्या अडीच वर्षांसाठी इतर मागासवर्गसाठी अध्यक्षपद राखीव झाले. त्यावेळी माण तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळणार, असे वातावरण होते. पण, विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यावेळी निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष असणाऱ्या रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटण तालुक्यात अध्यक्षपद नेले. त्यानंतर पक्षात रुसवे-फुगवे सुरू झाले. आजही ते दिसून येत आहेत. त्यामुळे पक्ष नेतृत्वांनी सांगूूनही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांशिवाय इतर कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला नाही. गेल्या दहा दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षासह इतर पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या व्यतिरिक्त कोणीही राजीनामा दिला नाही. तीन दिवसांपूर्वी पक्षाकडून सांगितले की, इतर पदाधिकारी हे सोमवारी राजीनामा देतील; पण सोमवारीही टाळाटाळ झाली. आता तर उपाध्यक्ष रवी साळुंखे, शिक्षण सभापती अमित कदम, कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, समाजकल्याण सभापती मानसिंग माळवे आणि महिला व बालकल्याण समिती सभापती कल्पना मोरे यांनी बंडाचा झेंडा फडकाविला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नावाने पत्रच दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जिल्हा परिषदेत पदाधिकारी म्हणून काम करताना विधानसभा व ग्रामपंचायत निवडणूक लागली. आचारसंहितेमुळे काम करता आले नाही. विकासात्मक व धोरणात्मक निर्णय घेता आले नाहीत. आम्हा सर्वांवर अन्याय झाल्याची भावना झाली आहे. त्यामुळे पत्राद्वारे बाजू मांडत आहोत. पक्षाकडून दि. ३१ मार्चपर्यंत काम करण्याची संधी मिळावी. आम्ही ३१ मार्च रोजीचे राजीनामे पत्रासोबत पाठवत आहोत. (प्रतिनिधी)