शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मिक@नॉट रिचेबल.कॉम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:25 IST

रवींद्र माने ।लोकमत न्यूज नेटवर्कढेबेवाडी : पाटण तालुक्यातील वाल्मिक पठारावरील बहुतेक गावे आजही मोबाईल सेवेपासून वंचित आहेत. संबंधित गावे ‘नॉट रिचेबल’ असल्याने शासनाच्या ‘संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र’ सुविधेचा फज्जा उडाला आहे. ग्रामपंचायत गावात आणि दप्तर ढेबेवाडीत अशी अवस्था डोंगरपठारावरील अनेक गावांची झाली आहे.ढेबेवाडी विभागातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत असूनही दाखला, उताऱ्यासाठी येथील ...

रवींद्र माने ।लोकमत न्यूज नेटवर्कढेबेवाडी : पाटण तालुक्यातील वाल्मिक पठारावरील बहुतेक गावे आजही मोबाईल सेवेपासून वंचित आहेत. संबंधित गावे ‘नॉट रिचेबल’ असल्याने शासनाच्या ‘संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र’ सुविधेचा फज्जा उडाला आहे. ग्रामपंचायत गावात आणि दप्तर ढेबेवाडीत अशी अवस्था डोंगरपठारावरील अनेक गावांची झाली आहे.ढेबेवाडी विभागातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत असूनही दाखला, उताऱ्यासाठी येथील जनतेची किमान वीस किलोमीटरची फरपट होते. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामपंचायतींमध्ये संगणक प्रणालीने ग्रामीण महाराष्ट्र जोडण्याचा क्रांतिकारी निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी ग्रामपंचायतींना संगणकाचे आधुनिक संच दिले. तो हाताळण्यासाठी संगणक तज्ज्ञांची खासगी कंपनीद्वारे नियुक्तीही करण्यात आली. राज्यभर ही यंत्रणा अगदी झपाट्याने पोहोचली खरी; पण त्यासाठी अपेक्षित असलेले मोबाईल नेटवर्क अजूनही ढेबेवाडी विभागातील डोंगर पठारावर पोहोचले नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.पाणेरी, ताम्हिणे, पांढरेपाणी, कसणी आदी गावांमध्ये ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. त्याठिकाणी शासनाने संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र योजनेंतर्गत लाखो रुपयांचे संगणक संच दिले. मात्र त्या गावांमध्ये कोणत्याही कंपनीचे मोबाईल नेटवर्क नसल्याने ते संगणक संच धूळखात पडले आहेत. एका बाजूला शासन पेपरलेस, झिरो पेंडन्सी तसेच संपूर्ण संगणकीय ग्रामपंचायती असा उपक्रम राबवत असताना या ग्रामपंचायती मात्र दूर असल्याचे चित्र ढेबेवाडी खोºयातील गावागावांमध्ये दिसून येते.कसे करायचे जीपीआर एस टँगिंग?शासनाकडून आता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या विविध कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अण्णासाहेबांना एक अ‍ॅप देण्यात आले आहे. त्या अ‍ॅपद्वारे ज्या ठिकाणी काम करायचे आहे तेथील फोटो काढून अपलोड करायचा व काम पूर्णत्वानंतर फोटो अपलोड करायचा तरच बील मंजूर होणार, असा नियम असल्याने अशा कामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.ढेबेवाडीतून चालतो ग्रामपंचायतीचा कारभारवाल्मिक पठारावरील नेहमीच नॉट रिचेबल असलेल्या काही ग्रामपंचायतीच्या अण्णासाहेबांनी ढेबेवाडी येथे कार्यालय भाडेतत्वावर घेतले असून, तेथूनच संपूर्ण ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. यामुळे ग्रामस्थांची मोठी फरफट होते. तसेच नाहक भुर्दंडही बसत आहे.अण्णासाहेबांच्या माथ्यावरकार्यालयाचे भाडे!गावाच्या सोयीसाठी आणि संगणकीय कामकाजासाठी ढेबेवाडी येथे भाडेतत्त्वावर घेतलेल्या कार्यालयाचे भाड्यासाठी शासनस्तरावर तरतूद नसल्याने त्याचा भुर्दंड अण्णासाहेबांना बसत आहे.