शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना साखळी तोडण्यासाठी वडूजकर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:37 IST

वडूज : कोरोना महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून दर आठवड्याच्या ...

वडूज : कोरोना महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून दर आठवड्याच्या शनिवार व रविवार या दिवशी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या धाकापेक्षा वडूजकरांनीच धास्ती घेतल्याने या महामारीची साखळी तोडण्यासाठी वडूजकर सज्ज झाले आहेत.

वडूज शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने वडूजकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारणानेच प्रशासनाच्या धाकापेक्षा कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी वडूज शहरातील नागरिकांनी नियमांची पायमल्ली न करता स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. यामुळे प्रशासनालाही होणारा अतिरिक्त ताण टळला. मेडिकल्स, रुग्णालये याव्यतिरिक्त कोणतीही दुकाने उघडी नव्हती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे वडूजकर भयभीत आहेत आणि सोशल मीडियावर बेड्‌स व व्हेंटिलेटर्स यांचा जिल्ह्यात तुटवडा आहे. यामुळे नेहमी गजबजलेले रस्ते सुनसान वाटू लागले आहेत. वडूज आगाराची बससेवा पूर्णतः ठप्प होती. तसेच शासकीय कार्यालये वीकेंड असल्याकारणाने बंद होती. त्यामुळे तालुक्यातील ये-जा करणाऱ्या नागरिकांची होणारी वर्दळ पूर्णपणे थांबली होती.

शहरातील भयभीत झालेले नागरिक घरातच थांबले होते. काही अपवाद वगळता शहरातील रस्त्यांवर तुरळक प्रशासनाचे कर्मचारी दिसून येत होते. रस्त्यावरील चौका-चौकात प्रशासनातील कर्मचारी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी सुसज्ज झाले आहेत.

फोटो : १२ वडूज फोटो

फोटो :

वडूज शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ( शेखर जाधव )