शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाठारस्टेशनला लक्षवेधी; देऊर बिनविरोध होणार?

By admin | Updated: February 10, 2015 23:55 IST

निवडणूक : कोरेगावच्या उत्तर भागात ग्रामपंचायतींची मोर्चेबांधणी

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या वाठार स्टेशन, देऊर, तळिये, तडवळे (सं) वाघोली या गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकींची राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आगामी सहा महिन्यांत या ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगतदार होणार आहेत. दरम्यान, वाठार स्टेशनची निवडणूक लक्षवेधी ठरणार तर देऊरची बिनविरोध होणार? याकडे लक्ष लागले आहे.वाठारस्टेशन ग्रामपंचायतीत मागील पंचवार्षिक निवडणूक तिरंगी झाली होती. त्यावेळी सरपंच अमोल आवळे यांनी प्रथमच परिवर्तन घडवत परिवर्तनचे आठ सदस्य निवडून आणले होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अंकुश जाधव, राष्ट्रवादीचे नागेश जाधव यांनी स्वतंत्र पॅनल उभे करून निवडणूक लढवली होती. पाच वर्षांतील वाठार ग्रामपंचायतीचा लेखाजोखा आता येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत वाठार स्टेशन मध्ये एक उमेदवार ज्यादा मिळाला असल्याने नऊ सदस्य स्टेशन मधून तर चार सदस्य वाठार गावातून निवडणूक लढविणार आहेत.कोरेगाव पंचायत समितीच्या सभापती रूपाली जाधव, नागेश जाधव यांच्यासाठी ही निवडणुका प्रतिष्ठेची राहणार आहे. वाठार स्टेशन व वाठार गावात नेहमीच निर्णायक भूमिका घेणारे माजी पंचायत समिती सदस्य अंकुश जाधव हे स्वतंत्र पॅनेल टाकरणार की, नागेश जाधव यांच्याबरोबर राहणार याची उत्सुकता वाठारकरांना आहे. तर विद्यमान सरपंच अमोल आवळे महायुतीच्या संपर्कात असून, परिवर्तन व महायुती एकत्रितपणे या निवडणुका लढण्याची चर्चा आहे. यामुळे गत पंचवार्षिक प्रमाणेच या वेळेही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. (वार्ताहर) शशिकांत शिंदेंची अग्निपरीक्षादेऊर ग्रामपंचायत ही विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. हे गाव आमदार शशिकांत शिंदे यांनी दत्तक घेतले आहे. शिंदे देऊर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात यशस्वी होणार का? हा मुख्य प्रश्न आहे. ३५ वर्षांनंतर देऊर ग्रामपंचायत ताब्यात घेतलेल्या जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम यांना यावेळी त्यांच्याच गटातील अंतर्गत कुरघोड्यांना सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रवादी अंतर्गत गावान तिन्ही गट असल्याने हे गट एकत्रित आणण्यास आमदार शशिकांत शिंदे कितपत यशस्वी होणार, याकडे परिसराचे लक्ष आहे.