शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशचा राजाभैय्या उदयनराजेंच्या भेटीला; साताऱ्यात केली दीड तास चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:55 IST

सातारा : उत्तर प्रदेशातील बाहुबली तथा राजद नेते रघुराज प्रतापसिंह ऊर्फ राजाभैय्या यांनी रविवारी दुपारी साताºयातील शासकीय विश्रामगृहावर खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रसिद्ध नेते म्हणून रघुराज प्रतापसिंह ऊर्फ राजाभैय्या यांची ओळख आहे. मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळामध्ये राजाभैया मंत्री होते. सुमारे सहावेळा कुंडा ...

सातारा : उत्तर प्रदेशातील बाहुबली तथा राजद नेते रघुराज प्रतापसिंह ऊर्फ राजाभैय्या यांनी रविवारी दुपारी साताºयातील शासकीय विश्रामगृहावर खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रसिद्ध नेते म्हणून रघुराज प्रतापसिंह ऊर्फ राजाभैय्या यांची ओळख आहे. मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळामध्ये राजाभैया मंत्री होते. सुमारे सहावेळा कुंडा या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून ते निवडून आले. गेल्या निवडणुकीत ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. दरम्यान, रविवारी दुपारी राजाभैय्या अकलूज येथील धवलसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या सहकाºयांसह साताºयात आले. विश्रामगृहावर खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. खासदार उदयनराजे यांनी राजाभैय्या यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले.राजाभैय्या म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत. माझ्या घरातील देव्हाºयात देवांशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीमा आहे. पहिल्यापासूनच छत्रपती घराण्यावर माझे विशेष प्रेम आहे. मी सोमवारी रायगड येथे जाणार आहे. छत्रपतींच्या समाधीवर नतमस्तक होणार आहे. तलवारीच्या जोरावर मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले, शिवछत्रपतींचे वंशज म्हणून खासदार उदयनराजे यांच्याबद्दल नितांत आदर आहे. उदयनराजे भोसले यांना उत्तर प्रदेशात येण्याचे आमंत्रण देणार आहे. त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर ठेवणार नाही. जंगी स्वागत करू.’यावेळी अभिनेते मुकेश तिवारी, अकलूजचे धवलसिंह मोहिते-पाटील, संग्राम बर्गे, जितेंद्र खानविलकर आदी उपस्थित होते.