शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

माढ्यात भाजपाला हुलकावणी; उत्तम जानकरांनी तुतारी फुंकली! 

By नितीन काळेल | Updated: April 20, 2024 18:33 IST

मोहितेंबरोबर मनोमिलन; निवडणुकीला मोठी कलाटणी 

सातारा : माढा मतदारसंघात मोठी राजकीय कलाटणी मिळाली असून, उत्तम जानकर यांनी भाजपाला हुलकावणी देत तुतारी फुंकली आहे. याबाबतचा निर्णय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यामुळे कट्टर विरोधक मोहिते-पाटील यांच्याबरोबरचे हे मनोमिलन असून, यातून जानकर यांचा विधानसभा निवडणुकीचा मार्गही मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे. माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आताची चाैथी निवडणूक होत आहे. पण, पहिल्या तीनपेक्षा आताची निवडणूक वेगळी आणि राजकीय घडामोडी वाढविणारी ठरली आहे. त्यामुळे माढा मतदारसंघात तुल्यबळ लढत अटळ आहे. त्यातच सुरूवातीला माढ्याची निवडणूक भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी सोपी वाटत होती. पण, भाजपामधून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटात जाऊन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उमेदवारी मिळवली. तेथेच लढत संघर्षाची होणार, हे स्पष्ट झाले.त्याचवेळी मोहिते-पाटील यांनीही माळशिरस तालुक्यातील पारंपरिक विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उत्तम जानकर यांनाही साद घातली. त्याला जानकर यांनीही उशिरा का असेना साद दिली आहे. आता याचा मोठा धक्का हा भाजपाला बसणार आहे.माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर यांची राजकीय ताकद दखलयोग्य आहे. आतापर्यंत त्यांनी मोहिते-पाटील यांच्याशी राजकीय दोन हात केले. याविरोधात विधानसभा निवडणूकही लढवली. पण याच जानकर आणि मोहिते-पाटील यांनी पाठीमागील लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रणजितसिंह यांच्यासाठी काम केले. आताच्या निवडणुकीत मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली. तसेच सोबतीला उत्तम जानकर यांनाही घेण्यात ते यशस्वी झाले आहेत. जानकर यांनी या निवडणुकीत ‘तुतारी’ हाती घेतल्याने भाजपाच्या हाती प्रयत्न करूनही ते लागले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

विधानसभेसाठी नावाची घोषणा; राष्ट्रवादीचे जयंत पाटील उपस्थित..माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे उत्तम जानकर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील तसेच जयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उशिरा हजेरी लावली. यावेळी जयंत पाटील यांनी उत्तम जानकर यांना माळशिरस विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचा शब्द दिला. त्यामुळे जानकर आणि मोहिते-पाटील यांचे मनोमिलन झाल्याचे समोर आले. आता जानकर यांचे विधानसभा निवडणुकीतील संकटही दूर झाले. तसेच यातून त्यांना अपेक्षा होती तेच मिळाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराmadha-pcमाढाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४dhairyasheel mohite patilधैर्यशील मोहिते पाटील