शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

फूटपाथला ब्लॉकऐवजी विटा वापरा--मिता राजीवलोचन यांची सूचना

By admin | Updated: September 11, 2014 23:16 IST

सातारा शहरात विविध ठिकाणांची केली पाहणी

सातारा : ‘सातारा शहरात पादचारी मार्गांसह बोळांतील काही रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले आहेत. हे पेव्हर ब्लॉक बसविणे खर्चिक आहे, तसेच टिकाऊ नसतात, पादचारी मार्ग तयार करताना विटांचा वापर करा,’ अशी सूचना नगरपालिका प्रशासनाच्या आयुक्त तथा संचालक मिता राजीवलोचन यांनी केल्या. राजीवलोचन यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांनी गुरुवारी सातारा शहराला भेट दिली. सकाळी आठ वाजता त्या पालिकेत आल्या. त्यानंतर गोडोली तलाव, विसर्जनासाठी पालिकेने तयार केलेले कृत्रिम तलाव, शाहू कलामंदिर, भाजी मंडई, नगरपालिका जुनी इमारत, सोनगाव कचरा डेपो, पॉवर हाऊस, सांबरवाडी जलशुद्धिकरण केंद्र, औद्योगिक वसाहत आदी ठिकाणांना त्यांनी भेट दिली. पालिकेने राबविलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. दरम्यान, पादचारी मार्गांवर त्यांना पेव्हर ब्लॉक टाकण्यात आल्याचे त्यांनी पाहिले. ‘एक पेव्हर ब्लॉक खराब झाला तरी पूर्ण रस्ता खराब होतो. पेव्हर ब्लॉक निसटल्यास पादचाऱ्यांना त्याचा धोका होऊ शकतो. विटा पाणी शोषून घेतात. तसेच कमी पैशाच्या वापरात पादचारी मार्ग तयार करता येतात, त्यामुळे पालिकेने पादचारी मार्गांसाठी विटांचा वापर करावा,’ अशी सूचना त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना केल्या. पालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी नगरसेवकांची मते जाणून घेतली. पालिकेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून मिळावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. करंजे औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन उद्योग आणण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन राजीवलोचन यांनी यावेळी दिले. या बैठकीला जिल्ह्यातील विविध पालिकांचे मुख्याधिकारीही उपस्थित होते. (प्रतिनिधी)आकृतिबंधाचा प्रश्न मार्गी लावणारसातारा पालिकेत कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाचा प्रश्न आहे. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवीन पदे भरता येत नसल्याने पालिकेला उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या बळावरच कामकाज चालवावे लागत आहे. ही पदे लवकरात लवकर भरणे गरजेचे असल्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांनी या बैठकीत केली. आकृतिबंधाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन राजीवलोचन यांनी यावेळी दिले.राज्यातील पालिकांची क्रमवारी ठरविणार४कार्पोरेट सेक्टरच्या धर्तीवर राज्यांतील पालिकांची क्रमवारी करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन, मुबलक पाणीपुरवठा तसेच राबविले जाणारे लोकाभिमुख उपक्रम यानुसार पालिकांचा क्रम ठरविण्यात येणार आहे. या क्रमवारीत पहिल्या दहा पालिकांच्या यादीत नाव येण्यासाठी सातारा पालिकेने प्रयत्न करावेत, असे आवाहन राजीवलोचन यांनी केले.महसूल वाढविण्याची पालिकेला सूचना४पालिकेने पाणीपट्टी, घरपट्टी व मिळकतींची भाडे वसुली वेळेत करावी, अशी सूचना राजीवलोचन यांनी प्रशासनाला दिली. नवीन उपक्रम राबवित असताना पालिकेकडे निधी उपलब्ध असणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील करवसुली वेळीत झाली तर पालिका प्रशासनाला शहरवासीयांना चांगल्या सुविधा मिळतील.रोड रोलर देण्याची मागणी४शहरातील रस्त्यांना पॅचिंगचे काम करण्यासाठी पालिकेकडे यंत्रणा उपलब्ध नाही, या कामासाठी देण्यात येणाऱ्या ठेक्यांना पालिकेचे जास्त पैसे जातात. रोड रोलर खरेदीसाठी पालिकेला परवानगी मिळत नाही, ही परवानगी मिळाल्यास पालिका रोड रोलर खरेदी करेल, या अविनाश कदम यांच्या मागणीवर परवानगी देण्यात येईल, असे राजीवलोचन यांनी सांगितले.मूर्ती विसर्जनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी४ सातारा पालिकेने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी व कमी उंचीच्या मूर्ती बसविण्याची सक्ती करणारा ठराव मंजूर केला आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सर्वच पालिकांची बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घ्यावा. मंगळवार तळ्याच्या स्वच्छतेसाठी नियोजन मंडळाचा निधी द्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.