शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

‘व्हॅली क्रॉसिंग’चा प्रयोग फसला!

By admin | Updated: January 29, 2015 23:38 IST

महाबळेश्वरात वन अधिकाऱ्यांकडे तक्रार : शासकीय अध्यादेशानुसार व्यावसायिक तत्त्वावर परवानगी नसल्याचा दावा

सातारा : ‘व्हॅली क्रॉसिंग’ या साहसी खेळाचा प्रारंभ महाबळेश्वरमध्ये करण्यात आला खरा; परंतु यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर तो तातडीने बंदही करण्यात आला. असा प्रकल्प वनविभागाच्या हद्दीत व्यावसायिक तत्त्वावर राबविता येणार नाही, असा सरकारी आदेश असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.यासंदर्भात माहिती अशी, महाबळेश्वरच्या केट््स पॉइंटजवळ दोराच्या साह्याने दरी ओलांडण्याचा (व्हॅली क्रॉसिंग) साहसी खेळ सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. अवखळी गावच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने हे निवेदन देण्यात आल्यावर नियमांना बगल देऊन केवळ तोंडी परवानगीनुसार हा खेळ तातडीने सुरू केल्याचा दावा पाचगणी येथील (सध्या रा. वाई) तक्रारदार शेख फरहा फझलकरीम पटाईत यांनी केला होता. महाबळेश्वर-पाचगणी हा ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ आहे.१९८० च्या वन कायद्यानुसार वनखात्याची जागा अशा खेळांना देता येत नाही. तसेच, १९९७ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनक्षेत्रात कोणत्याही प्रकल्पाला परवानगी देण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. २००५ मध्ये राज्य शासनाने अध्यादेश काढून साहसी खेळांना वनक्षेत्रात व्यावसायिक तत्त्वावर परवानगी देता येणार नाही, असे म्हटले होते. या सर्व नियमांचा दाखला पटाईत यांनी तक्रार अर्जात दिला होता. जेथे हा साहसी खेळ सुरू केला होता, तेथे वन्यजीवांचा वावर आहे. तेथे मानवी जीविताला अनेक प्रकारे धोका पोहोचू शकतो, असे पटाईत यांनी सांगितले. त्यांनी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)तक्रारीनंतर ‘साहसा’ला स्वल्पविरामतक्रारीनंतर ‘साहसा’ला स्वल्पविरामतक्रार दाखल केल्यानंतर ‘व्हॅली क्रॉसिंग’चा साहसी खेळ तूर्तास बंद करण्यात आला आहे, असे वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ‘खरे तर प्रशिक्षित साहसपटूंमार्फत या ठिकाणी साहसी खेळांचे प्रशिक्षण देता येणे शक्य आहे; तथापि तक्रार दाखल झाल्यानंतर या बाबतीत कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. ‘व्हॅली क्रॉसिंग’संदर्भात रीतसर प्रस्ताव तयार करून नव्याने परवानगी घेण्यात येईल,’ असे वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.