शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

उरमोडीच्या पाण्याबद्दल राजकारण नको

By admin | Updated: August 28, 2016 23:57 IST

जयकुमार गोरे : पाणीपूजन उत्साहात; पळशीत बंधारे भरायला प्रारंभ

पळशी : ‘माण तालुक्यातील अनेक पिढ्यांनी पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहिली आहे. या भागात पाणी येऊन दुष्काळी कलंक पुसला जावा, अशी कित्येक वर्षांपासून जनता अपेक्षा करत आहे. आजचा दिवस माणगंगा नदीसाठी ऐतिहासिक आहे. उरमोडीच्या पाण्याने माणगंगेवरील बंधारे भरत असून, अपेक्षा पूर्ण होत आहे. या पाण्यासाठी गेली सात वर्षे जीवापाड परिश्रम केले आहे. पाण्याचे मोल जाणून त्याचा काटकसरीने वापर करा. या पाण्याबाबत कुणीही राजकारण करू नका,’ असे आवाहन आ. जयकुमार गोरे यांनी केले. पळशी, ता. माण येथे उरमोडीच्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी म्हसवडचे नगराध्यक्ष रवींद्र वीरकर, माजी नगराध्यक्ष विजय धट, दादासाहेब काळे, सोमनाथ भोसले, डी. एम. अब्दागिरे, लुनेश वीरकर, अकील काझी, बाळासाहेब पिसे, अ‍ॅड. दत्तात्रय हांगे, लक्ष्मण माळवे, उद्धव लव्हाळे, संजय खाडे, दिलीप खाडे, तुकाराम खाडे, एल. डी. खाडे, रघुनाथ हांगे, एकनाथ सावंत, आनंदा देवकुळे, अण्णा नाकाडे, राजू जाधव, उमेश पाटोळे, सागर हांगे व ग्रामस्थ उपस्थित होते. आ. गोरे म्हणाले, ‘गेल्या सात वर्षांपूर्वी मी माण-खटावच्या जनतेला पाणी आणण्याचे स्वप्न दाखविले. पहिल्यांदा आमदार होताना साडेतीन वर्षांत पाणी आणण्याचा शब्द दिला. दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. जनतेच्या विश्वासावर प्रयत्नांची वाटचाल सुरू ठेवल्याने प्रयत्नांना यश आले. उरमोडीचे पाणी साडेतीन वर्षांत खटावला व नंतर पुढे माण तालुक्यात आणले, प्रयत्न करणाऱ्यांवरच टीका केली जाते. गोड फळे देणाऱ्या आंब्याच्या झाडालाच दगड मारले जातात. या निसर्ग नियमाप्रमाणे पाण्यासाठी काहीच योगदान न देणाऱ्यांनी आणलेल्या पाण्याबाबत गळे काढले. काही महाभागांनी तर कुठे आहे पाणी? असे म्हणत केकाटायलाही मागेपुढे पाहिले नाही. उरमोडीचे पाणी दोन वर्षे खटाव तालुक्यात आले, माणमध्येही आले. अगदी म्हसवडपर्यंत माणगंगेद्वारे पोहोचले. तरीही सवयीप्रमाणे काहींनी त्यात नेहमीच राजकारण आणले. कोण काय बोलतो, याच्याशी काही देणे-घेणे नाही. माझी बांधिलकी इथल्या जनतेप्रती आहे. इथल्या मातीला दुष्काळी संबोधलेले मला चालणार नाही, त्यासाठी ही धडपड सुरू आहे.’ पावसाळ्यात उरमोडी धरणातून वाया जाणारे पाणी माण-खटावला देण्यात यावे, अशी मागणी अधिवेशनात केली. जलसंपदामंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली. उरमोडीचे पाणी आता माणमध्ये आले आहे. अ‍ॅड. दत्तात्रय हांगे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. (वार्ताहर) माणमध्ये माझेच सरकार! ‘उरमोडीचे पाणी खूप परिश्रमाने आणलेय. त्यासाठी सात वर्षे खर्ची घातलीत, ते पाणी जपून वापरा, असे सांगतानाच ज्यांना ५ वर्षांत स्वत:च्या अंघोळीपुरतेच पाणी आणता आले नाही. त्यांना पाण्यावर बोलण्याचा अधिकारच नाही,’ असा टोला आ. गोरेंनी लगावला. राज्यात सरकार कुणाचेही असो; माण-खटावमध्ये मात्र जयकुमारचेच सरकार आहे. समोरची जनता बरोबर असेपर्यंत ते कायमच राहील, असेही त्यांनी सांगितले.