शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रोष्टर दोन महिन्यांत अद्ययावत करा

By admin | Updated: June 5, 2016 00:48 IST

शासनाचे आदेश : आंतरजिल्हा बदलीच्या प्रस्तावांना मिळणार गती

सातारा : रोष्टर पूर्ण करण्याअभावी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, बढत्या रखडल्या आहेत, या पार्श्वभूमीवर ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या वतीने सर्व विभागीय आयुक्त (आस्थापना) व राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दोन महिन्यांत रोष्टर पूर्ण करण्याचे लेखी आदेश १ जून रोजी दिले आहेत. या आदेशांमुळे आंतरजिल्हा बदलीसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत असणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. रोष्टर पूर्ण न करता सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने बदल्या व बढत्यांची कार्यवाही सुरू करण्यात आली होती, या प्रक्रियेवर रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनने आक्षेप घेतला होता. रोष्टरचे काम पूर्ण झाले नसताना नियमबाह्यरितीने सातारा जिल्हा परिषदेमध्ये केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी पदोन्नतीची प्रक्रिया सुरू होती, या प्रक्रियेमुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा येत असून, संघटनेने रोष्टर अद्ययावत करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा व मदत केली आहे, तरी शिक्षण विभागाचे रोष्टर का पूर्ण होत नाही?, असा सवाल उपस्थित केला आहे. ही पदोन्नती प्रक्रिया तत्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली होती. जिल्हाध्यक्ष गणेश दुबळे, सचिव शिवाजी भोसले, उपाध्यक्ष नरेश कारंडे, शशिकांत घाडगे, चेतन तोडकर, ललिता बाबर आदींच्या वतीने हे निवेदन देण्यात आले होते. फेडरेशनचे अध्यक्ष संदीप फणसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलनही करण्यात आले होते. रोष्टर तपासणीची प्रक्रिया गतिमान केली असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेने दिल्यानंतर आंदोलन मागे घतले. ‘लोकमत’ ने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक असणाऱ्या शिक्षकांची बाजू वारंवार मांडली. त्यानंतर रोष्टरच्या कामाला गती मिळाली. शिक्षक नेमणुकीच्या काही याद्या सापडत नव्हत्या. त्या सापडल्यानंतर सुटीच्या कालावधीतही जिल्हा परिषदेत बिंदूनामावलीसाठी लागणाऱ्या बाबींची जुळवाजुळव सुरू राहिली. दरम्यान, राज्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याने दि. २६ मे रोजी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव रोष्टर अद्ययावत नसल्याने दीर्घकाळ प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी रोष्टर अद्ययावत करण्याची कार्यवाही दोन महिन्यांच्या आत पूर्ण करून घेऊ, असे आश्वासन ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते. यानंतर ग्रामविकास विभागाचे उप सचिव प्रि. शं. कांबळे यांनी सर्व जिल्हा परिषदांना आपले रोष्टर अद्ययावत करून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी, कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रोष्टर अद्ययावत केल्याचे विभागीय आयुक्त कार्यालय (मागासवर्गीय कक्ष) यांचे प्रमाणपत्र शासनाला सादर करावे, उपायुक्त (आस्थापना) यांना त्या अनुषंगाने रोष्टर अद्ययावत करण्याच्या दृष्टीने नियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात येत आहेत. याप्रकरणी आढावा घेऊन रोष्टर अद्ययावत करण्याची कार्यवाही विहीत वेळेत पूर्ण करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)