शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

बिनविरोधसाठी हालचाली सुरू

By admin | Updated: October 1, 2015 00:34 IST

९३ ग्रामपंचायती : कोडोली, चिंचणेर वंदन, भरतगाव, अंगापूर, पाडळी, नागठाणे, मांडवेत येणार रंगत

सातारा : जिल्ह्यातील १७१ ग्रामपंचायतींच्या दुसऱ्या टप्प्यातील सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वात जास्त ९३ ग्रामपंचायती सातारा तालुक्यातील आहेत. मागील निवडणुकीत २३ ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात दोन्ही राजेंच्या स्थानिक शिलेदारांना यश आले होते. आताही जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध करण्याच्या हालचाली जोरदार सुरू आहेत.पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. तालुक्यातील आंबळे, कोडोली, समर्थनगर, काळोशी, अंबवडे बु, कोंदणीनरेवाडी, सांबरवाडी, किडगाव, अंगापूर तर्फ तारगाव, कोंडवे, सारखळ, कुमठे, अतीत, कुसवडे, तासगाव, कुरुण, आवाडवाडी, कुशी, ठोसेघर, कुस खु., बनघर, लांडेवाडी, वर्णे, लिंबाचीवाडी, बसाप्पाचीवाडी, लावंघर, वासोळे, मग्दुलभटाची वाडी, भरतगाव, महागाव, वेणेगाव, निगुडमाळ, भाटमरळी, माजगाव, वाढे, नुने, बोर्णे, मांडवे, अगुंडेवाडी, पाटेश्वरनगर, चिंचणी, मापरवाडी, आकले, पिलाणीवाडी, चिंचणेर वंदन, मस्करवाडी, चाळकेवाडी, राकुसलीवाडी, चोरगेवाडी, नागठाणे, चिखली, रामकृष्णनगर, डबेवाडी, नांदगाव, दरे तर्फ परळी, रेवंडे, गणेशवाडी, नेले, देवकल पारंबे, रोहट, गोवे, निनाम, धनगरवाडी, सैदापूर, हमदाबाज, पाडळी, धनगरवाडी (निगडी), शिंदेवाडी, जांभे, पाटेघर, धनवडेवाडी, शिवथर, ज्योतिबाचीवाडी, पाटखळ, इंगळेवाडी, सोनवडी, कळंभे, पेट्री, जाधववाडी, वनगळ, करंडी, पिंपळवाडी, जरेवाडी, यादववाडी, खडगाव, पोगरवाडी, जवळवाडी, भैरवगड, खोडद या ग्रामपंचायतींची निवडणूक लागली आहे.मागील निवडणुकीमध्ये सातारा तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींपैकी २८ ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधारी व विरोधकांच्यात जोरदार रस्सीखेच झाली. अनेक ठिकाणी सत्ता परिवर्तनही झाले. शहरासह तालुक्यात बहुतांश सत्तास्थाने ही खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनाकडे आहेत. मागील निवडणुकीत ४१ ग्रामपंचायतीपैकी २३ दोघांनीही बिनविरोध करून दाखविल्या. निवडणूक झालेल्या इतर ग्रामपंचायतींमध्ये मनोमिलनाची सत्ता आली. त्यामुळे या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे. (प्रतिनिधी)इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंगआगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोमिलनाविरोधात मोठा प्रतिस्पर्धी अद्याप रिंगणात नाही. मात्र, दोन राजेंचेच कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या गटांवर डोळा ठेवून नेत्यांकडे ग्रामपंचायतीचं तिकीट मागायचे, अशाही व्यूव्हरचना काहीनी आखल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून नेत्यांकडे तिकिटासाठी हट्ट धरला आहे.