शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

लिफ्ट मागणार्‍या प्रवाशाला अपहरण करून लुटले अज्ञात तिघांवर गुन्हा : पडक्या बंगल्यात अपहृताला ठेवले डांबून

By admin | Updated: May 17, 2014 00:27 IST

सातारा : महामार्गावरून लिफ्ट मागणे यापूर्वी अनेक प्रवाशांच्या अंगलट आले असतानाही काही प्रवाशी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

सातारा : महामार्गावरून लिफ्ट मागणे यापूर्वी अनेक प्रवाशांच्या अंगलट आले असतानाही काही प्रवाशी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. येथील अजंठा चौकामध्ये महामार्गावर उभे राहून लिफ्ट मागणार्‍या प्रवाशाचे अपहरण करून तिघाजणांनी त्याच्याकडील ऐवज आणि रोकड लांबवली. एवढेच नव्हे तर संबंधित आरोपींनी त्या प्रवाशाला शहराजवळील एका पडक्या बंगल्यात डांबूनही ठेवले होते. असेही तपासात समोर आले आहे. याबाबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयवंत गणपती लोहार (वय ४४ मुळ रा.वाटेगाव ता. वाळवा, सध्या रा. धनगरवाडी, सातारा) हे दि. १३ रोजी पहाटे सव्वासहाच्या सुमारास वाटेगावला निघाले होते. येथील अंजठा चौकामध्ये महामार्गावर ते उभे राहिले होते. पुणे बाजूकडून झेन कार (एमएच ०९ ६६९१) आली. त्या कारमधील तीन व्यक्तींनी त्यांना ‘कासेगावपर्यंत सोडतो,’ असे सांगितले. त्यामुळे लोहार त्यांच्या कारमध्ये बसले. चालकाने कार खिंडवाडीपासून महामार्गावरून आडरानात नेली. त्यानंतर सोनगाव कचरा डेपो परिसरातील एका पडक्या बंगल्यात सर्वजण गेले. त्या ठिकाणी लोहार यांना डांबून ठेवण्यात आले. त्यांच्याकडील ८ हजारांची रोकड आणि एटीएम काढून घेतले. त्यानंतर त्यांना सोडून दिले. अपहरणकर्ते शेंद्रेमार्गे निघून गेले. या घटनेनंतर लोहार यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ ठिकठिकाणी नाकाबंदी केली. मात्र अपहरणकर्ते सापडले नाहीत. त्यांच्या कारचा नंबर मिळाला असल्यामुळे लवकरच अपहरणकर्ते सापडतील, असा विश्वास पोलिसांना आहे. (प्रतिनिधी)