शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जावळी-तरडगावात संघ; परळी-मायणीत समिती

By admin | Updated: June 18, 2015 00:38 IST

शिक्षक बँक निवडणूक : शिक्षक समिती-संघाची बँकेतील सत्तेसाठी प्रतिष्ठा पणाला

कुडाळ : प्राथमिक शिक्षक बँकेची सत्ता मिळविण्यासाठी शिक्षक संघ, समितीमध्ये काऊंटडाऊन सुरू झाले असून, ग्रामीण भाग प्रचाराने ढवळून निघाला आहे. जिल्ह्यात गिरवी- तरडगाव, जावळी, फलटण, खंडाळा, दहिवडी यासह नऊ ते दहा मतदारसंघांत संघाची एकसंध ताकद पाहायला मिळत आहे. यामुळे येथील संघाचे उमेदवार निश्चित आहेत. तर सत्ताधारी समिती परळी, मायणी, वाई, रहिमतपूर यासह पाच ते सहा मतदारसंघांत मजबूत असलेली पाहायला मिळत आहे.या निवडणुकीत दोन्ही शिक्षक संघ एकत्र आल्याने शिक्षकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. शिक्षक संघाच्या कायम पाठीशी राहिलेल्या जावळीत संघाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशीच राहण्याचा इतिहास आहे. त्यामुळेच जावळीतून आत्तापर्यंत बँकेत संघाचे उमेदवार गेलेले आहेत. यावेळीही एकत्रिकरण झालेल्या जावळी मतदारसंघात शंकर जांभळे विरोधी समितीचे संपत शेलार असा सामना होत आहे. तर गिरवी-तरडगाव मतदारसंघात देखील संघाचीच ताकद आहे. पूर्वीचा गिरवी मतदारसंघ आता तरडगाव-साखरवाडी मिळून एक झालेला आहे. गिरवी हा गट अनेक वर्षांपासून संघाचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. या मतदारसंघातून शिक्षक संघाचे राज्य कोषाध्यक्ष तुकाराम कदम निवडणूक लढवित असल्यामुळे संघातील शिक्षक, कार्यकर्ते तन-मन-धन पणाला लावून काम करीत असलेले पाहायला मिळत आहेत.तर कदम यांना अपक्ष उमेदवार संतोष निंबाळकर यांनी माघार घेऊन साथ दिल्यामुळे शिक्षक समितीचे उमेदवार संजय बोबडे हे बॅकफूटवर गेले आहेत. या मतदारसंघासह जिल्ह्यात संघातील मनोमिलनामुळे फलटण-बरड, दहिवडी, खंडाळा, महाबळेश्वर, कराड- पाटण सह नऊ ते दहा मतदारसंघांत संघाची चांगलीच ताकद वाढलेली पाहायला मिळत आहे.शिक्षक समितीचा परळी मतदारसंघ हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याठिकाणी समितीचे अनिल चव्हाण विरोधी शिक्षक संघाचे राजकुमार जाधव असा सामना होताना पाहायला मिळत आहे. तर मायणीत समितीचे चंद्रकांत मोरे विरोधी शिक्षक संघाचे नवनाथ खरमाटे यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघटनांनी बँकेतील सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. तर दोन्ही संघ सत्ता आमचीच येणार, असा दावा करीत आहेत. त्यामुळे ज्या संघटनेच्या पॅनेलच्या सर्वसाधारण गटातील अधिक जागा येतील त्या संघटनेच्या पॅनेलमधीलच राखीव गटातील पाच उमेदवार विजयी होतील,हे निश्चित. त्या दृष्टीने शिक्षक सभासदांनी पॅनेल टू पॅनेल, असे काम सुरू ठेवलेले दिसत आहे. (प्रतिनिधी)राज्य कोषाध्यक्षांचे कडवे आव्हान...पाटीलप्रणित संघ व थोरातप्रणित संघाला एकत्र आणण्याचे काम पाटील गटाचे राज्य कोषाध्यक्ष तुकाराम कदम यांनी पाटील गटाकडून मोठी भूमिका बजावली. ते स्वत: तरडगाव गटातून निवडणूक लढवित आहेत. येथे शिक्षक समितीचे काही नेते नाराज आहेत. तर कदम हे गिरवीचे रहिवासी व तरडगाव परिसरात नोकरी करीत असल्यामुळे त्यांचा दोन्ही विभागांमध्ये जनसंपर्क पाहता त्यांची ‘कदम-कदम बढाए जा,’ अशी स्थिती असून, त्यांनी समितीसमोर कडवे आव्हान उभे केले आहे.