शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याच्या कमरेखालील भाग लुळा

By admin | Updated: February 24, 2016 00:30 IST

जावळी तालुक्यात रुग्णांमध्ये वाढ : दुर्मिळ ‘जीबीएस’ आजाराची लक्षणे; उपचारासाठी पुण्याला हलविले

 भुर्इंज : वाई तालुक्यातील पाचवड येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या शरीराचा कमरेखालचा भाग लुळा पडायला लागला आहे. त्या विद्यार्थ्यामध्ये गंभीर स्वरूपाच्या ‘जीबीएस’ आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यावर जिल्ह्णात उपचार होत नसल्याने त्याला पुण्याला हलविण्यात आले आहे. यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाचवड येथे शिक्षण घेणारा जावळी तालुक्यातील म्हसवे येथील आयुष अभिजित शिर्के (वय १२) या विद्यार्थ्यामध्ये दहा दिवसांपासून ‘ज्युलियन बार सिंड्रोम’ ‘जीबीएस’ची लक्षणे दिसू लागली आहेत. त्याच्या कमरेखालील शरीर अचानक कमजोर झाल्याने पालकांनी त्याला वाई येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, संबंधित रुग्णालयात आजाराचे निदान न झाल्याने आयुषची प्रकृती अधिकच खालावली. आयुषला पुणे येथे ‘केईएम’ रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबत बोलताना आयुषचे वडील अभिजित शिर्के म्हणाले, ‘आयुषची प्रकृती गंभीर आहे. हा आजार झाल्यानंतर लगेच निदान झाले असते तर उपचार तातडीने झाले असते. या आजाराबाबत कोणालाच फारशी माहिती नसल्याने भयावह परिस्थिती उद्भवली आहे. आयुषला दररोज दहा ते पंधरा हजारांची इंजेक्शन द्यावी लागत आहेत. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास त्याला व्हँटिलेटरवर ठेवावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.’दरम्यान, या आजाराची लक्षणे शोधण्यासाठी व या आजाराची माहिती देण्यासाठी शाळांमध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणी मोहीम हाती घेत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये या दुर्मिळ आजाराविषयी माहिती होईल, अशी माहिती भुर्इंज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेश बिरारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)अशी आहेत लक्षणे..श्वसनाचे आजार, जुलाब व उलट्या झाल्यानंतर हातापायाला मुंग्या, बधीर होणे व वेदना जाणवतात. हा आजार शरीरातील रोगप्रतिकारशक्ती नष्ट करतो. बऱ्याचदा या आजाराची सुरुवात पायापासून होते. दोन ते चार आठवड्यांमध्ये पाय लुळे पडायला सुरुवात होते. हृदय आणि फुप्फुसापर्यंत हा आजार पोहोचला तर तो घातक ठरू शकतो. या आजारावर उपचार आहेत; मात्र ते पुणे व मुंबई अशा मोठ्या शहरातच सध्या उपलब्ध आहेत, अशी माहिती डॉ. जंगम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.‘ज्युलियन बार सिंड्रोम’ असे या आजाराचे पूर्ण नाव आहे. १९१६ मध्ये या आजाराचा रुग्ण सर्वप्रथम इंग्लडमध्ये आढळला होता. गेल्या महिन्याभरात या आजाराची लक्षणे असणारे रुग्ण जावळी तालुक्यात अचानकपणे आढळू लागले आहेत.- डॉ. पी. बी. जंगम, वैद्यकीय अधिकारी, कुडाळ