शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
3
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
4
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
5
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
6
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
9
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
10
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
11
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
12
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
13
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
14
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
15
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
16
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
17
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
18
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
19
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
20
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'

शब्दहीन उद्रेकाला अनपेक्षितपणे कातर किनार!

By admin | Updated: August 25, 2015 23:47 IST

‘आवाज’ बुलंद करणारच : शिक्षिकेच्या निधनामुळं मूकबधिर तरुणांनी मोर्चा केला रद्द; पण जोश कायम

सातारा : अशी कुठली नोकरी आहे, जी आम्ही करू शकत नाही? हॉर्न वाजवू नका, असं तुम्हीच म्हणता; मग कुठल्या आधारावर आम्हाला लायसेन्स नाकारता? केवळ वाणी नाही म्हणून इतरांपेक्षा वेगळं का समजता आम्हाला? भीक नकोय; हक्क हवाय. त्यासाठी आम्ही आमचा ‘आवाज’ इतका बुलंद करू, की ध्वनिलहरींविना तुम्हाला तो ऐकावाच लागेल!समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मूकबधिर विद्यालयात मंगळवारी तरुण नेते जोशात ‘बोलत’ राहिले. शेकडो मैलांवरून आलेले दीडशे तरुण ही भाषणं ‘ऐकत’ राहिले. खास पद्धतीनं टाळ्या वाजवून ‘वक्त्या’ला प्रोत्साहित करत राहिले. मात्र, या शब्दहीन उद्रेकाला एक कातर किनार होती. मूकबधिर विद्यालयाच्या शिक्षिका ज्योती जाधव आज पहाटेच त्यांना सोडून गेल्या. या दु:खद घटनेमुळं तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरचा प्रस्तावित मोर्चा रद्द केला; पण छोटेखानी सभा घेऊन आपल्या न्याय्य मागण्यांचा जागर केला. लवकरच मोर्चासाठी एकत्र येऊ, असा दृढनिश्चय केला.यातले बहुतांश तरुण-तरुणी याच शाळेत शिकलेले. यात आठ जोडपी. संस्थापक पार्थ पोळके यांनी शाळेतल्याच मुलामुलींची लग्नं लावून दिली असून, इतरांपेक्षा कितीतरी सुखाचा संसार ही जोडपी करतायत. सगळ्यांची वेदना सारखीच. इतरांपेक्षा तसूभर कमी नसताना वेगळी वागणूक कशासाठी? आॅफीसमध्ये शिपाई म्हणून काम करताना फाईलवरचं नाव वाचता येईल ना आम्हाला? ‘एमएससीआयटी’ केलंय; ‘टॅली’ येतंय. मग क्लार्क म्हणून नोकरी का देत नाही आम्हाला? आमच्यातले अनेकजण कारखान्यांमधून काम करतायत; मग आयटीआयमध्ये प्रवेश का नाकारला जातो आम्हाला?छोट्याशा सभेत हे सगळे विषय ‘चर्चिले’ गेले. मुद्दा आवडला की ‘श्रोते’ हात उंचावून, तळवे हलवून खास पद्धतीनं टाळ्या देत राहिले आणि त्या ‘ऐकून’ वक्त्यांचा जोश वाढत राहिला. या तरुणांची राज्यव्यापी संघटना आहे. ‘जिल्हा मूकबधिर असोसिएशन’ ही तिची शाखा. अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष उमेश शिंदे, सचिव चंद्रकांत हिंगमिरे, खजिनदार दिनेश फाळके, सदस्य श्रीरंग पवार, नीलेश कांबळी, अनिकेत जगदाळे, प्राजक्ता कुलकर्णी, मनीषा पवार, दीपाली सोनावणे, मोनाली रिटे, सुनील गायकवाड या जिद्दी कार्यकर्त्यांनी मित्र-मैत्रिणींशी ‘जळजळीत भाषेत’ संवाद साधला. मग सभेत एक फलक आणण्यात आला. त्यावर लिहिलं गेलं, ‘ज्योती जाधव, मूकबधिर शिक्षिका यांचे पहाटे दु:खद निधन. विनम्र श्रद्धांजली!’ करपल्लवीद्वारे इशारा होताच सगळे उभे राहिले आणि जाधव मॅडमना श्रद्धांजली वाहिली. (प्रतिनिधी) ‘जपान रिटर्न’ पहिलवानसभास्थानी कोरेगाव तालुक्यातल्या कुमठे गावचे भरत जगदाळे यांची भेट झाली. पहिलवान गडी! अपंगांच्या क्रीडा स्पर्धांमधला स्टार! नऊ वेळा राष्ट्रीय पातळीवर आणि दोन वेळा राज्य पातळीवर कुस्तीत पदक मिळवणारा हा रांगडा गडी. जपानमध्ये झालेल्या अपंगांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धेत गडी चौथं बक्षिस घेऊन आलाय; पण कुणाच्या समोर गेलं की ‘मूकबधिर’ ही ओळख पुसली जात नाही, याची अतोनात खंत त्याला त्रस्त करत राहते. जोरजोरात हातवारे करून तो हे दु:ख सांगू पाहत होता. अपंगांना तीन टक्के आरक्षण आहे. पण अंध, मूकबधिरांसाठी सरकारचं धोरण सदोष आहे. ४५ टक्के श्रवणदोष असेल, तरच नोकरी मिळते. गुणवत्ता असताना हा भेदभाव का? ९५ टक्के श्रवणदोष असणारेही अनेक जागांसाठी पात्र असतात. आमच्याच शाळेतील काही मुले उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळं हा भेदभाव संपेपर्यंत आम्ही आंदोलन तीव्रच करणार आहोत.- पार्थ पोळके, संस्थापक, समता शिक्षण प्रसारक संस्था