सातारा-गूड न्यूज--अजय जाधव - उंब्रज--वेडसर ‘बिहारीबाबू’ला एक महिना सांभाळून दिल्लीत असणाऱ्या त्याच्या भावाला बोलावून घेऊन ताब्यात दिले. हे काम केले येथील जयजवान आॅटो रिक्षा युनियनने. दिवसभर अर्जुन या युवकाच्या सोबत हा बिहारी बाबू दिसू लागला. उंब्रज-मसूर प्रवासी रिक्षामध्ये त्याची उपस्थिती दिसू लागली. त्याला नाष्टा, जेवण या युवकांकडूनच मिळू लागली. अंगावरची कपडे बदलू लागली. काही दिवसांपूर्वी अर्जुनच्या तोंडातून भावाचा मोबाईलनंबर सहज बाहेर आला. तो ‘कॅच’ करत युवकांनी त्याच्या भावाला फोन केला.दिल्ली येथे मोलमजुरी करणारा भाऊ राजकुमार भगत (मूळ रा. सिंहत्रान, बिहार) हा फोन जाताच ‘बंधू’प्रमाणे लगेच उंब्रजकडे रवाना झाला. राजकुमार उंब्रजला पोहोचला यावेळी ‘मुड’मध्येच ‘अर्जुन’च्या चेहऱ्यावरील हावभाव बदलू लागले हसऱ्या ‘अर्जुन’च्या चेहऱ्यावर बदल झाला. तो ढसाढसा रडू लागला ‘राजकुमार व अर्जुन’ या ताटातूट झालेल्या भावांची परत भेट झाली. रिक्षा युनियनच्या या युवकांनी परत दोघांनाही जेवण देऊन मसूर रेल्वेस्टेशनला सोडले.रिक्षाचालकांचा मोठेपणाएक महिन्यापूर्वी येथे अर्जून नावाचा एक वेडसर फिरत होता. व्यापाऱ्याच्या दुकानासमोरील साफसफाई करणे, मिळेल ते खाणे असा दिनक्रम त्यांने सुरू केला होता. परंतु तो मिळेल त्यावर समाधानी होता; परंतु त्याचे कपडे, वागणे, यामुळे लोकही पुन्हा त्याला टाळू लागले होते. याच कालावधीत येथील जयजवान आॅटो रिक्षा युनियनच्या निखील घाडगे, अरुण मंडले, श्रीकांत माने, मुराद या युवकांची नजर अर्जुनवर पडली.
बिहारी बंधूभेटीसाठी उंब्रजकर सरसावले
By admin | Updated: April 4, 2015 00:03 IST