शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

उंब्रज, कोपर्डे हवेलीत राष्ट्रवादी; शिरगावात सत्तांतर

By admin | Updated: November 4, 2015 00:11 IST

तांबवेत त्रिशंकू : चुरशीने झालेल्या पाच ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्याचे लक्ष लागलेल्या चार संवेदनशील ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. उंब्रज व कोपर्डे हवेलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकविला, तर शिरगावात सत्तांतर झाले. तांबवेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व एका ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. मंगळवारी सकाळी दहा वाजता येथील रेव्हिन्यू क्लबमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला. यावेळी तहसीलदार राजेंद्र शेळके, निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड उपस्थित होते. सुरूवातीला उंब्रज ग्रामपंचायतीची मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलने १० जागा जिंकत बाजी मारली. कोपर्डे हवेलीतही ९ जागा मिळवत राष्ट्रवादीने सत्ता राखली. शिरगावमध्ये सह्याद्री पॅनेलला दणका देत ग्रामविकास पॅनेलने १० जागा जिंकत सत्तांतर घडवले. तांबवेत भैरवनाथ पॅनेलने ६, सहकार पॅनेलने ५ तर तांबजाई पॅनेलने २ जागा जिंकल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. १८ कर्मचाऱ्यांमार्फत सहा टेबलवर मतमोजणी करण्यात आली. प्रत्येक टेबलवर दोन कर्मचारी व एक सहायक निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दुपारी बारा वाजता पाच ग्रामपंचायतींचे निकाल तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी) कोपर्डे हवेलीतील विजयी उमेदवार येथे राष्ट्रवादी समर्थकांनी ९ जागा जिंकल्या तर माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर, स्वाभिमानीचे नेते मनोज घोरपडे, काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांच्या समर्थकांनी ६ जागा मिळविल्या. विजयी उमेदवार : लक्ष्मण हिंदुराव चव्हाण (५२६), बनुबाई तात्या शिरतोडे (४९३), अनिता जगन्नाथ चव्हाण (५०६), महेश भीमराव चव्हाण (४८६), वंदना संजय लोहार (५२३), अर्चना शंकर चव्हाण (५०४), बापूराव तुकाराम कुंभार (४८९), नेताजी रामचंद्र चव्हाण (४८९), मयूरी विकास तुपे (४१९), दत्तात्रय शंकर काशिद (५६७), शिवाजी पांडू चव्हाण (४७२), उषाताई विलास साळवे (५४६), मेघा श्रीकांत होवाळ, बाळुताई मोहन सरगडे (६२२), सारीका दत्तात्रय पाटील (६०२) अशा मतांनी १५ उमेदवार निवडून आले. शिरगावचे विजयी उमेदवार शिरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाले. या ठिकाणी ग्रामविकास पॅनेलचे ६ तर सह्याद्री पॅनेलचे ३ उमेदवार निवडून आले. विजयी उमेदवार : विजय बाबुराव पाटील (२९२), वंदना भीमराव शिलेवंत (२५६), ताई तात्यासाहेब महाडिक (२७७), मोहन शंकर यादव (२४९), गुलशन उस्मान मुजावर (२५५), पद्मावती महादेव जाधव (२४०), रामचंद्र कृष्णा सुतार (२२७), संतोष वसंतराव यादव (२३१), कल्पना सुरेश गायकवाड (२४७). तांबवेतील विजयी उमेदवार संपत बाजीराव साठे (३१५), नंदाताई सदाशिव साठे (२८८), जावेद रूस्तुम मुल्ला (४३५), विमल बाबुराव पवार (४५४), संतोष रामचंद्र कुंभार (४०३), विठोबा वसंत पाटील (४४८), प्रदीप जालिंदर पाटील (२७५), सुवर्णा दत्तात्रय देशमुख (२४८), नंदाताई संभाजी करपे (२८७) अशा मतांनी एकूण १३ उमेदवार निवडून आले उंब्रजचे विजयी उमेदवार उंब्रजमध्ये राष्ट्रवादीपुरस्कृत उंब्रज विकास आघाडीने १० जागा मिळवून सत्तेचा मार्ग सुकर केला. विरोधात ठाकलेल्या माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, काँग्रेसचे धैर्यशील कदम, स्वाभिमानीचे मनोज घोरपडे यांच्या समर्थकांनी भैरवनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून ७ जागा मिळविल्या. विजयी उमेदवार : बबन रामचंद्र चव्हाण (७७४), विनायक रामचंद्र जाधव (६८०), पद्मावती साहेबराव जाधव (७३८), रवींद्र किसनराव जाधव (५२०), लता उत्तम कांबळे (५४४), विजय बाबुराव जाधव (५०५), संगीता संजय चव्हाण (६७५), मंगल बबन पवार (६०४), जयवंत संभाजीराव जाधव (७३६), कल्पना भीमराव जाधव (६७५), कमल तानाजी जाधव (७५२), अजित संपतराव जाधव (७२८), मंदाकिनी शिवलिंग लोखंडे (७७९), मंगल हिंमतराव जाधव (८०६), साधना मोहन कमाने (७५५), नौशाद हजरत मुलाणी (६६६), मंदाकिनी रघुनाथ जाधव (७८९).ं