शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या राज्य बैठकीत उदयनराजे यांची हजेरी...

By admin | Updated: December 29, 2016 00:29 IST

९ जानेवारीला आंदोलन : नोटाबंदीविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार

सातारा : राजधानी सातारा विकास आघाडीची आदल्या दिवशी (मंगळवारी) घोषणा करणारे खासदार उदयनराजे भोसले बुधवारी पुणे येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या राज्य बैठकीला हजर राहिले. मोजक्या शिलेदारांसहित त्यांनी उपस्थिती लावली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत स्वतंत्र आघाडीची घोषणा करणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत खासदार शरद पवार यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याची चर्चा कपोलकल्पितच ठरली.राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजधानी सातारा विकास आघाडीची संकल्पना मंगळवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केली. या बैठकीला सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुधवारी गुलटेकडी (पुणे) येथील राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. नरेंद्र पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील व संपूर्ण राज्यातील प्रदेश प्रतिनिधी हजर राहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय झाला. समविचारी पक्षांना सोबत घेऊन ९ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात आंदोलन छेडण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी खासदार व आमदारांच्या बैठकीत खा. शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी व प्रदेश प्रतिनिधींची त्यानंतर बैठक झाली. (प्रतिनिधी)शरद पवारांशी शिवेंद्रसिंहराजेंची चर्चाआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले बुधवारच्या बैठकीला अनुपस्थित होते. मात्र, घरगुती कारणाने आपण घरीच राहिल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची वैयक्तिक भेट घेतली असून, यात साताऱ्याशी संबंधित अनेक राजकीय घडामोंडीबाबत गंभीर चर्चा झाली आहे. तसेच येत्या ८ जानेवारी रोजी शेंद्रे येथील ‘अजिंक्यतारा’ उद्योग समूहाच्या परिसरात होणाऱ्या कार्यक्रमासही पवारांनी येण्याचा शब्द दिला आहे. निवडणुकांमध्ये निधी नाहीआगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रदेश कार्यालयाकडून निधी दिला जात होता. परंतु आता पक्षाची आर्थिक परिस्थिती विचारात घेता, स्थानिक पातळीवरच निर्णय घ्यावेत, तसेच आर्थिक निधीची तरतूदही करण्यात यावी, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बैठकीत केले.