शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंनी फडकावला ‘लोकमत’चा अंक

By admin | Updated: August 27, 2014 23:29 IST

गोडोली पूर : मंत्र्यांशी चर्चा; ओढे संकुचित करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सातारा - गोडोली परिसरातील ओढ्यांचे नैसर्गिक स्त्रोत, अतिक्रमणे करून संकुचित करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच पूरस्थिती मानवनिर्मित आहे का? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि वने, पुनर्वसन आणि आपत्ती निवारण मंत्री पतंगराव कदम यांना समक्ष भेटून निवेदनाव्दारे केली आहे. पुराची भीषणता दाखविण्यासाठी खासदार उदयनराजे यांनी ‘लोकमत’चा अंक दाखवला.सातारा जिल्ह्यात ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस पडला. ढगफुटीमुळे कोट्यवधींचे वित्तीय नुकसान नागरिक व व्यावसायिकांचे झाले आहे. नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने आर्थिक मदत शासनाकडून मिळावी, सातारा शहरातील विशेष करून गोडोली परिसरात मोठे नुकसान झाले आहे. दि. २० आॅगस्ट रोजी दीड तासात सुमारे ८२ मिलीमीटर इतका मोठ्या पावसाची नोंद झाली. तर दि. २१ आॅगस्ट रोजी ७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या ढगफुटीमुळे सातारकरांचे अतोनात नुकसान झाले. कुणाचे कौटुंबिक साहित्य वाहून गेले. घरे व घरांच्या भिंतींची पडझड झाली, कुणाच्या वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी जाऊन वाहने कायमस्वरूपी नादुरुस्त झाली आहेत. डोंगर उतारावरून येणाऱ्या गोडोली परिसरातील ओढ्यांवर बेकायदेशीर अतिक्रमणे करून ओढ्यांची नैसर्गिक रुंदी कमी केल्याने आणि नैसर्गिक स्त्रोत कृत्रिमरीत्या लहान व्यासाच्या पाईपलाइन टाकून बंदिस्त केले गेल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊन, नागरिकांना अत्यंत बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे.पूरपरिस्थितीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत. याप्रकरणी नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत आपत्ती निवारणाखाली देण्यात यावी. सातारा शहरातील विशेष करून गोडोलीपरिसरातील ओढ्यांचे नैसर्गिक स्त्रोत, अतिक्रमणे करून संकुचित करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच पूरपरिस्थिती मानवनिर्मित आहे कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. (प्रतिनिधी)