शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंनी फडकावला ‘लोकमत’चा अंक

By admin | Updated: August 27, 2014 23:28 IST

गोडोली पूर : मंत्र्यांशी चर्चा; ओढे संकुचित करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सातारा - गोडोली परिसरातील ओढ्यांचे नैसर्गिक स्त्रोत, अतिक्रमणे करून संकुचित करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच पूरस्थिती मानवनिर्मित आहे का? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि वने, पुनर्वसन आणि आपत्ती निवारण मंत्री पतंगराव कदम यांना समक्ष भेटून निवेदनाव्दारे केली आहे. पुराची भीषणता दाखविण्यासाठी खासदार उदयनराजे यांनी ‘लोकमत’चा अंक दाखवला.सातारा जिल्ह्यात ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस पडला. ढगफुटीमुळे कोट्यवधींचे वित्तीय नुकसान नागरिक व व्यावसायिकांचे झाले आहे. नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने आर्थिक मदत शासनाकडून मिळावी, सातारा शहरातील विशेष करून गोडोली परिसरात मोठे नुकसान झाले आहे. दि. २० आॅगस्ट रोजी दीड तासात सुमारे ८२ मिलीमीटर इतका मोठ्या पावसाची नोंद झाली. तर दि. २१ आॅगस्ट रोजी ७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या ढगफुटीमुळे सातारकरांचे अतोनात नुकसान झाले. कुणाचे कौटुंबिक साहित्य वाहून गेले. घरे व घरांच्या भिंतींची पडझड झाली, कुणाच्या वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी जाऊन वाहने कायमस्वरूपी नादुरुस्त झाली आहेत. डोंगर उतारावरून येणाऱ्या गोडोली परिसरातील ओढ्यांवर बेकायदेशीर अतिक्रमणे करून ओढ्यांची नैसर्गिक रुंदी कमी केल्याने आणि नैसर्गिक स्त्रोत कृत्रिमरीत्या लहान व्यासाच्या पाईपलाइन टाकून बंदिस्त केले गेल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊन, नागरिकांना अत्यंत बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे.पूरपरिस्थितीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत. याप्रकरणी नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत आपत्ती निवारणाखाली देण्यात यावी. सातारा शहरातील विशेष करून गोडोली परिसरातील ओढ्यांचे नैसर्गिक स्त्रोत, अतिक्रमणे करून संकुचित करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच पूरपरिस्थिती मानवनिर्मित आहे कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. (प्रतिनिधी)‘लोकमत’चा आधारगोडोली येथे घडलेल्या महापुराच्या प्रकाराविषयी ‘लोकमत’ने सविस्तर वार्तांकन केले होते. ‘लोकमत’मध्ये आलेल्या या वृत्ताचे अंक घेवून उदयनराजे यांनी मंत्री पंतगराव कदम आणि बाळासाहेब थोरात यांना वास्तव दाखविले. यावेळी विलास आंबेकर व सागर राजेमहाडिक उपस्थित होते.मुंबई येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व वनमंत्री पतंगराव कदम यांना मागण्यांचे निवेदन सादर करताना खा. उदयनराजे भोसले. यावेळी सागर राजेमहाडिक, मंत्री बाळासाहेब थोरात व विलास आंबेकर उपस्थित होते. पुराची भीषणता दाखविण्यासाठी यावेळी ‘लोकमत’चा अंक दाखवला गेला.