शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे गटाच्या संचालकांचे राजीनामे

By admin | Updated: November 17, 2016 21:04 IST

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा बाजार समिती, तालुका व जिल्हा खरेदी-विक्री संघातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थक असणाऱ्या १४ संचालकांनी गुरुवारी आपले राजीनामे दिले

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. 17 : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा बाजार समिती, तालुका व जिल्हा खरेदी-विक्री संघातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थक असणाऱ्या १४ संचालकांनी गुरुवारी आपले राजीनामे दिले. या संस्थांमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या भ्रष्टाचार झाल्यामुळेच माझ्या विचाराच्या संचालकांनी राजीनामे दिल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अजित पवार यांच्यामुळेच राज्याची वाताहात झाल्याचा आरोप करून त्यांच्यासह इतर नेत्यांच्या भ्रष्टाचाराची फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाबून ठेवल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. खा. उदयनराजे म्हणाले, ह्यमाझ्या विरोधात आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. वास्तविक २५ वर्षांपासून सांगत आलोय मी भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. माझा स्वत:चा भाऊ जरी असला तरी मी तत्त्वाशी बांधील असल्याने मी समाजाशिवाय दुसरा विचारच करत नाही. सातारा बाजार समितीमधील भ्रष्टाचाराबाबत तक्रार केल्यानंतर सहकार विभागाने याची चौकशी केली. बाजार समितीत कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल चौकशी अधिकाऱ्यांनी दिला आहे. या अधिकाऱ्यांनी बँकेचे तत्कालीन सभापती राजू भोसले, सतीश चव्हाण, किरण साबळे-पाटील, व्यापारी संजय झंवर यांना वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. या सर्वांनी निविदा न काढता बाजार समितीची जागा २८ वर्षांच्या करारावर देऊन टाकली आहे. आता सहकार विभागाने बाजार समितीवर प्रशासक नेमून संचालक मंडळाच्या खासगी मालमत्तेवर जप्ती आणावी, अशी मागणी मी केली आहे.ह्णज्यांना ही नोटीस बजावली आहे, ते सर्वजण आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जवळचे आहेत. या भ्रष्टाचाराची माहिती जर त्यांना नसेल तर मोठा विनोद होईल, अशी टीकाही खासदार उदयनराजेंनी यावेळी केली. मी तुमच्यातला नाही...ह्यतालुका, जिल्हा खरेदी-विक्री संघात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशीची मागणी आपण करणार आहे. या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आपल्याकडे असून, मी ती चौकशी अधिकाऱ्यांना सादर करेन. माझ्यावर आरोप करणाऱ्या शिवेंद्रसिंहराजेंनी ध्यानात घ्यावे की मला टक्केवारीच खायची असती तर तुमच्याशी मिळते जुळते घेऊन वाटून खाल्ले असते. पण मी तुमच्यातला नाही. मी तत्त्वाला बांधील आहे. मी तुटेन; पण तत्त्व सोडणार नाही,ह्ण असा इशाराही खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिला.