शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे, मानकुमरेंचे कार्यकर्ते भिडले!

By admin | Updated: February 21, 2017 19:09 IST

जावळी तालुक्यातील खर्शी-बारामुरे येथील मतदान केंद्रावर खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वसंतराव मानकुमरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. 21 : जावळी तालुक्यातील खर्शी-बारामुरे येथील मतदान केंद्रावर खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वसंतराव मानकुमरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांच्या पायलट व्हॅनची तसेच उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.खर्शी-बारामुरे येथील केंद्रावर खासदार उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत गेले होते.

या ठिकाणी अगोदरच वसंतराव मानकुमरे, पत्नी आणि कार्यकर्त्यांसह हजर होते. अचानक कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची पायलट व्हॅन तसेच खासदार उदयनराजे यांच्या समर्थकांच्या कारची तोडफोड केली. यामध्ये एक पोलिस व मानकुमरे यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या आहेत. या प्रकारानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही तत्काळ खर्शी येथील मतदान केंद्रावर भेट दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता