शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे-शिवतारे गळाभेट!

By admin | Updated: January 28, 2015 00:54 IST

विश्रामगृहात ‘ओन्ली युती’ : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाहेर पाठविले

सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या आक्रमक स्वभावाबाबत संपूर्ण राज्याला माहित आहेत. त्यांच्याविषयी बोलताना त्यांच्याच पक्षातीलच काय पण विरोधी पक्षातील लोकांचीही तंतरते. त्यांच्या या आक्रमकपणाची साक्ष सोमवारी अनेकांना पाहायला मिळाली. शिवसेनेचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांची त्यांनी विश्रामगृहावर गळाभेट घेतली. या भेटीआधी त्यांनी हॉलमधील राष्ट्रवादी व काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी बाहेर जावे, इथे फक्त बीजेपी अन शिवसेनेचे लोक थांबतील, असे सांगून पक्षाला घरचा आहेर दिला.पालकमंत्री विजय शिवतारे जिल्हा दौऱ्यावर असताना सातारा येथील शासकीय विश्रामगृहात उदयनराजेंनी त्यांची गळाभेट घेतली. एंट्रीवेळीच त्यांनी काँगे्रस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाहेर जाण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांसोबत जिल्ह्याविषयी तसेच सातारा पालिकेच्या विविध विषयांवर चर्चा केली. या भेटीची चर्चा जिल्हाभर गाजत आहे. विजय शिवतारे व उदयनराजे भोसले हे दोघेही अजित पवार यांचे कट्टर विरोधक मानले जातात. मागील पाच वर्षांत राष्ट्रवादीकडे सत्ता असतानाही बहुतांश कार्यक्रमांना उदयनराजे हजेरी लावत नसत. मात्र, त्यांनी शहर तसेच जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत पालकमंत्र्यांची बराच वेळ चर्चा केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उदयनराजेंनी पालकमंत्र्यांसोबत हजेरी माळावरील शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या बांधकामाच्या ठिकाणाला भेट दिली. या वस्तू संग्रहालयाचे काम गेल्या ६ वर्षांपासून बंद स्थितीत आहे. याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. हे काम श्रेयवादात अडकले आहे. या जागेऐवजी जुन्या राजवाड्यात हे वस्तू संग्रहालय झाले असते तर खूप कमी पैशांत व ऐतिहासिक जागेतच ते झाले असते व ही जागा दुसऱ्या चांगल्या कामासाठी वापरता आली असती; परंतु श्रेय कुणी घ्यायचे यावरुन राजकारण करुन चांगले काम कसे बिघडते, याची खंत त्यांनी पालकमंत्री शिवतारे यांना बोलून दाखविली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, काँगे्रसचे जिल्हा सरचिटणीस सुनील काटकर, माजी नगराध्यक्ष नासीर शेख, सुजाता राजेमहाडिक, स्मिता घोडके, सुजाता गिरीगोसावी, नगरसेवक विजय बडेकर, माधुरी भोसले, आशा पंडित, अ‍ॅड. शिरीष दिवाकर, किशोर पंडित, शिवाजी भोसले व इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)