शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंच्या छावणीचा सर्वच बंडोबांना सहारा!

By admin | Updated: January 30, 2017 23:27 IST

घडामोडींना वेग : समविचारी लोकांना सोबत घेऊन आघाडीचे उमेदवार

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा विकास आघाडीची घोषणा करणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वच पक्षांतील बंडोबांना आपल्याकडे खेचण्याचा सपाटा लावला आहे. उदयनराजेंचे मुख्य टार्गेट सातारा व जावळी हे दोन तालुके आहेत. राष्ट्रवादीचे बहुतांश बंडखोर उदयनराजेंसोबत संधान साधून असल्याची खात्रीशीर माहिती पुढे येत आहे. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी काँगे्रस, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे पक्ष सरसावले आहेत. उदयनराजेंच्या विचारांची अनेक मंडळी भाजपच्या गोटात जाऊन विसावू लागली आहेत. सातारा व जावळी या दोन तालुक्यांवर उदयनराजेंच्या राजधानी सातारा विकास आघाडीचे विशेष लक्ष असल्याने विविध पक्षांतील आपल्या विचारांच्या लोकांना ते सातारा तालुक्यातूनही उमेदवारी देण्याची शक्यता आहे. सातारा तालुक्यात पक्षीय राजकारणापेक्षा आघाड्यांचे राजकारण मोठ्या प्रमाणावर चालते. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे दोन गट एकमेकांशी लढायला सज्ज झाले आहेत. आता जावळीतही उदयनराजेंनी लक्ष घातले असून, तिथूनही राष्ट्रवादीतील बंडखोर हेरून त्यांना उदयनराजेंकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. उदयनराजेंनी काही दिवसांपूर्वी भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली होती. शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांच्याशीही त्यांची बोलणी झाली होती. हे दोन्ही पक्ष आपल्या चिन्हांवर निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत. त्यांच्या या आग्रहाचा आदर राखून जिल्ह्यात जागोजागी आघाडी करण्याची तयारी उदयनराजेंनी सुरू केली आहे. मात्र, या सर्वच हालचाली अत्यंत गोपनीयरीत्या सुरू आहेत. ‘भाजप व शिवसेना, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांच्या नेत्यांनीही उदयनराजेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काही दिवसांत उदयनराजे काय चमत्कार दाखवितात, हे बघाच!’ असा निर्धार उदयनराजेंचे निकटवर्तीय खासगीत व्यक्त करताना पाहायला मिळते.अमित कदमांचेही ‘हम साथ साथ’राष्ट्रवादीला रामराम करणारे माजी शिक्षण सभापती अमित कदम यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. ते कोणत्या पक्षात जातील, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असले तरी ते खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबतच राहणार आहेत, असा ठाम विश्वास त्यांचे निकटवर्तीय व्यक्तकरीत आहेत. उदयनराजेंनी सातारा तालुक्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलेले आहे. जिल्ह्यात जे समविचारी लोक आहेत, त्यांना उमेदवारी देऊन निवडणूक लढली जाणार आहे.