शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

खासदार उदयनराजेंनी केले शरद पवारांच्या गाडीचे सारथ्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 10:11 IST

सातारा : गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षापासून अत्यंत दूर गेलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी सकाळी चक्क शरद पवार यांच्या गाडीचे सारथ्य केले. पुण्याहून हे दोघे एकत्र साताऱ्यात आले, तेव्हा अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे डोळे अक्षरशः विस्फारले गेले.

ठळक मुद्देपुणे ते सातारा दोघांचा एकत्र प्रवास .

सातारा : गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षापासून अत्यंत दूर गेलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी सकाळी चक्क शरद पवार यांच्या गाडीचे सारथ्य केले. पुण्याहून हे दोघे एकत्र साताऱ्यात आले, तेव्हा अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे डोळे अक्षरशः विस्फारले गेले. विजयादशमीचा 'शाही दसरा सोहळा' साताऱ्यात साजरा झाल्यानंतर उदयनराजे पुण्यातच होते. बुधवारी शरद पवारांचा सातारा जिल्हा दौरा ठरविण्यात आला होता. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे अन् राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील बहुतांश नेते यांच्यातील वाद प्रचंड उफाळला असतानाच मंगळवारी दोघांचे मोबाईलवर बोलणे झाले होते. त्यानंतर आज सकाळी ते एकत्र भेटले. 'चर्चा करतच साताऱ्याला जाऊ,' असे ठरल्यानंतर शरद पवारांनी उदयनराजेंना आपल्या गाडीत बोलाविले. उदयनराजे पवारांच्या गाडीत बसले खरे परंतु त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने थेट गाडीची चावीच आपल्या हातात घेतली. ड्रायव्हिंग सीटवर राजे बसले तर शेजारी शरद पवार. पुण्याहून साताऱ्याला येताना त्या दोघांमध्ये बरीच राजकीय चर्चा झाली. साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहात ही गाडी आल्यानंतर उपस्थितांना प्रचंड धक्का बसला.  सध्या सातारा नगरपालिकेतील घंटागाडी आंदोलनावरून राजमाता कल्पनाराजे अन् आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात पत्रकबाजीचा प्रचंड धुरळा उडाला आहे.  उदयनराजेंच्या विरोधात दाखल झालेल्या खंडणी गुन्ह्यातही 'फलटण'चा हात असल्याचा आरोप केला गेला होता.त्यावेळी भिलार मुक्कामी शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की, 'आजूबाजूची माणसे नेत्याला गोत्यात आणतात. त्यामुळे चांगली माणसे पारखून जवळ बाळगावीत.' या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा प्रवासात पवारांनी उदयराजेंना कोणता कानमंत्र दिला, याची उत्सुकता लागून राहिली आहे.  गेल्याच आठवड्यात राजेंच्या ताब्यातील आनेवाडी टोलनाकाही काढून घेतला गेला. या सर्व पार्श्वभूमीवर पवारांची गाडी राजेंनी  चालविली, याला सातारा जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. बुधवारी दिवसभर शरद पवार सातारा जिल्ह्यात असून या ठिकाणी राजे त्यांच्यासोबत असणार काय, याकडेही लक्ष लागून राहिले आहे.