शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंनी कोरेगाव-भीमापेक्षा साताºयाच्या प्रश्नांवर बोलावे ओव्हाळ यांची टीका ; भिडे- एकबोटे यांना अटक करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:03 IST

सातारा : ‘कोरेगाव-भीमा घटनेबाबत बोलण्यापेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी साताºयाच्या प्रश्नांवर बोलावे,

सातारा : ‘कोरेगाव-भीमा घटनेबाबत बोलण्यापेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी साताºयाच्या प्रश्नांवर बोलावे,’ अशी मागणी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी केली.

ओव्हाळ म्हणाले, ‘कोरेगाव-भीमामध्ये घडलेली घटना नियोजनबद्ध घडवून आणली असून, याप्रकरणी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना तातडीने अटक करावी. अशा लोकांची पाठराखण करणाºया खासदार उदयनराजे यांना त्या दोघांनी सांगितलेला इतिहास मान्य आहे का, हे स्पष्ट करावे. ’

छत्रपती घराण्याचे वंशज म्हणून मान, सन्मान मिळत आहे. छत्रपती या शब्दामध्ये सर्वधर्म समभाव असा व्यापक अर्थ दडला आहे. त्यामुळे हा वारसा सांगताना खासदार उदयनराजे भोसले यांनी खरा इतिहास समजून घ्यावा. त्यानंतर जो इतिहास मान्य होईल, त्याबाबत वक्तव्य करावे. कोरेगाव-भीमाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जाणीवपूर्वक गालबोट लावणारे वक्तव्य करण्यापेक्षा खासदार उदयनराजे यांनी साताºयातील मेडिकल कॉलेज, उद्योगधंद्याचे स्थलांतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे रखडलेले काम यावर बोलाव, असेही दादासाहेब ओव्हाळ म्हणाले. यावेळी बाबा ओव्हाळ, अजित नलावडे, किरण बगाडे, राजू सावंत आणि पदाधिकारी उपस्थित होते.राजेंनी रयतेच्या बाजूने उभे रहावे : पार्थ पोळके‘एकबोटे अन् भिडे हे अत्यंत सज्जन आहेत, या भाषेत खासदार उदयनराजेंनी त्यांचा गुणगौरव केला आहे. यापुढे छत्रपती शिवरायांचे वंशज असलेल्या कोल्हापूरकर अन् सातारकर यांच्यापैकी नेमके कुणाचे जनतेने ऐकायचे, हे तरी उदयनराजेंनी स्पष्टपणे सांगावे. आम्ही कार्यकर्ते शिवशाहीच्या बाजूने अन् पेशवाईच्या विरोधात लढाई लढतोय, हेही उदयनराजेंनी समजून घ्यावे. मात्र, आमच्यासारख्या समतावादी मंडळींसोबत राहून चळवळीतील विचारांचे समर्थन करणे वेळोवेळी उदयनराजेंना जड गेले आहेच. यापूर्वीही राजेंनी अ‍ॅट्रॉसिटी विरोधात भाष्य केले होते, याचे वाईट वाटते,’ असे पत्रक विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी काढले आहे.