शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शेतात जाऊन उदयनराजेंनी केली पेरणी

By admin | Updated: June 14, 2016 00:23 IST

कुरी धरून हाकले ‘सर्जा-राजा’ : राजेंच्या या पैलूचीही चर्चा

सातारा : यंदाच्या मोसमी पावसात तरी पावसाने बळीराजाला धीर द्यावा म्हणून दस्तुरखुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनीच प्रत्यक्ष शेतात जाऊन पेरणीचा शुभारंभ केला. परळी खोऱ्यातील अंबवडे खुर्द मानेवाडी येथे त्यांनी स्वत:च औत हातात धरल्याने शेतकरी वर्गामध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. खासदार उदयनराजे भोसले हे कधी काय करतील, याचा अंदाज भल्या भल्यांना आलेला नाही. अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतलेल्या उदयनराजेंना कोणत्याही क्षेत्राचे वावडे नाही, हे त्यांनी यापूर्वीही अनेकदा सिध्द केले आहे. रविवारी अनाहुतपणे घडलेल्या प्रसंगाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. उदयनराजे एका भूमिपूजन समारंभासाठी अंबवडे खुर्द मानेवाडी येथे आले होते. भूमिपूजन समारंभ पार पडल्यावर तेथून परत जाताना एका शेताजवळ पेरणीसाठी औत धरण्याची तयारी सुरू होती, हे पाहताच उदयनराजेंनी त्यांची गाडी थांबवण्याचा इशारा केला. त्याबरोबर त्यांच्या गाडीसह इतर गाड्यांचा ताफाही थांबला. खासदार उदयनराजे भोसले हे थेट गाडीतून उतरून पायवाटेने पाभार (कुरी) धरण्याची तयारी सुरू असलेल्या शेतात गेले. तेथील औताची तयारी कशी चालू आहे, याचे त्यांनी काही वेळ निरीक्षण केले. त्यानंतर त्यांनी स्वत: औत घेऊन बैलांना जोडून पेरणीच्या कामास सुरुवात केली. उदयनराजेंनी स्वत: हातात धान्याची मूठ धरल्याचे पाहताच शिवारातील नागरिकही उत्सुकतेने घटनास्थळी आले. राजेंच्या या पवित्र्याने सारेच अचंबित झाले. औत कसे धरायचे, हाकारा कसा करायचा, याची असलेली परिपूर्ण माहिती पाहून उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी सभापती सुनील काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य भिकूभाऊ भोसले, माजी पंचायत समिती सदस्य संजय भंडारे, भूमाताचे जिल्हाध्यक्ष धर्मराज जगदाळे, अशोक सावंत, अनिल निकम आदींसह बहुसंख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी) शेतात जाऊन प्रत्यक्ष कुरीवर मूठ धरत खासदार उदयनराजेंनी चक्क पेरणी केली. त्यावेळी रवी साळुंखे, सुनील काटकर, भिकूभाऊ भोसले, संजय भंडारे, धर्मराज जगदाळे, अशोक सावंत, अनिल निकम उपस्थित होते.