शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंनी सन्मानासाठी भाजपात जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:58 IST

सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार हे शरद पवार यांना उदयनराजेंबद्दल काहीही सांगून राजकीय वातावरण बिघडवत आहेत. त्यापेक्षा उदयनराजेंनी सन्मान ...

सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार हे शरद पवार यांना उदयनराजेंबद्दल काहीही सांगून राजकीय वातावरण बिघडवत आहेत. त्यापेक्षा उदयनराजेंनी सन्मान जपण्यासाठी भाजपमध्ये जाऊन सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घ्यावी, असे बहुतांशी समर्थकांनी गोपनीय बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांची गोपनीय बैठक झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, शिक्षण समितीचे माजी सभापती सुनील काटकर, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, अ‍ॅड. दत्ता बनकर, सुनील सावंत, राजेंद्र यादव, जितेंद्र खानविलकर, विजय यादव, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, विकास शिंदे, संदीप शिंदे, किशोर शिंदे, विजय नायकवडी, महेश गुरव, जयवंत पवार, संग्राम बर्गे यांच्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणचे कार्यकर्ते उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार उदयनराजे भोसले हे तिसऱ्यांदा सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित आहेत; पण त्यांच्या मार्गावर राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांकडूनच काटे टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच आमदारांनी अनेकवेळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेही उदयनराजेंबद्दल अनेक तक्रारी केल्या आहेत. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनीही स्वतंत्र जाऊन पवार यांची भेट घेतली होती. तसेच साताºयात बैठक घेऊन लोकसभेला उदयनराजेंना मदत करण्याबाबत नाखुशी दाखविली होती. त्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी कार्यकर्त्यांना विचारात घेऊन काय तो निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनीच साताºयात गोपनीय बैठक घेऊन आपली मते मांडली.साताºयातील या बैठकीत बहुतांशी समर्थकांनी राष्ट्रवादीचे आमदार हे शरद पवारांकडे उदयनराजेंबद्दल तक्रारी करतात. शिवेंद्रसिंहराजेंचे कार्यकर्तेही विरोधासाठी बैठका घेतात. खुद्द शिवेंद्रसिंहराजे हेही ‘मिसळ’ खाऊन दबाव टाकतात. अशा गोष्टींमुळे उदयनराजेंनी भाजपमध्ये जावे. कारण, भाजप हा उदयनराजेंसाठी सुरक्षित पक्ष आहे. तेथील नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादीमध्ये अवमानकारकरीत्या थांबण्यापेक्षा भाजपमध्ये जाऊन उमेदवारी घ्यावी, असे स्पष्ट केले. तसेच उदयनराजे जो निर्णय घेतील तोही मान्य असेल, असेही या बैठकीत स्पष्ट केले. गोपनीय बैठकीतील कार्यकर्त्यांच्या या मतामुळे खरेच उदयनराजे भाजपमध्ये जाणार का? हा प्रश्न आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या या बैठकीमुळे खळबळ उडाली आहे.विरोधकांना वेळ आल्यावर जागा दाखवू...या बैठकीत जोरदार राजकीय खलबते झाली. राष्ट्रवादीत उदयनराजेंना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही. यापाठीमागे विरोध करणारे अनेक आहेत. अशा विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा वेळ आल्यानंतर दाखवून देऊ, असा स्पष्ट इशाराही यावेळी उदयनराजे समर्थकांनी दिला.