शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे हे तर सगळ्याच पक्षांचे नेते : शशिकांत शिंदे

By admin | Updated: January 25, 2016 00:54 IST

गोरेंची स्टंटबाजी : झेडपीतील बंडखोरांना प्रसंगी पक्षातून बाहेर काढू

सातारा : ‘खासदार उदयनराजे हे जिल्ह्याचे खासदार आहेत. त्याचबरोबर ते सगळ्याच पक्षांचे नेते आहेत,’ असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावला. आमदार गोरे यांनी जिल्हा बँकेच्या विरोधात उपोषण केल्यानंतर उदयनराजे यांनी त्यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी वरील वक्तव्य केले. दरम्यान, आमदार जयकुमार गोरे यांचे आंदोलन म्हणजे राजकीय स्टंटबाजी असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, जिल्हा परिषदेतील बंडखोरांनी नेत्यांचा आदेश मानला नाही तर त्यांना पक्षातून बाहेर काढले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. येथील राष्ट्रवादी भवनामध्ये जनता दरबार संपल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे हे पत्रकारांशी बोलत होते. आ. शिंदे म्हणाले, ‘जिल्हा बँकेच्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठी संपल्यातच जमा आहे. यावर चर्चा करून महत्त्व कोणाला द्यायचे नाही. परंतु गोरेंनी केलेले आंदोलन म्हणजे एक राजकीय स्टंट होता. त्यांना स्टंटबाजीसाठी राजकीय मैदाने मोकळी आहेत. बँकेच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ नये म्हणून आमचा प्रयत्न होता. त्यामुळे आंदोलन करण्यापूर्वी त्यांच्याशी मी चर्चा केली होती; परंतु त्यांना उपोषण करायचेच होते. त्यातून त्यांचा हेतू काय होता, हे स्पष्ट आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुदत वाढवून मिळाली नाही तर पदाचा आणि पक्षाचाही राजीनामा देईन, अशी तंबी दिली आहे. यावर पक्षाची भूमिका काय? असा प्रश्न आमदार शिंदे यांना विचारण्यात आला. आ. शिंदे म्हणाले, ‘पाचपैकी चार जणांनी राजीनामा दिला आहे. मात्र दोन पदाधिकाऱ्यांनी मुदत वाढवून मागितली आहे. परंतु त्यांना आम्ही खुलासा मागवून तत्काळ राजीनामा द्या, असे सांगितले आहे. त्यातूनही त्यांनी ऐकले नाही तर त्यांना पक्षातून बाजूला केले जाईल,’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. महिला पदाधिकाऱ्यांच्या मारामारी प्रकरणावर ते म्हणाले, ‘पक्ष कार्यालयात बेशिस्तपणा चालणार नाही. या ठिकाणी जनतेचा राबता असतो. पक्षाची शिस्त मोडणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रवादीमध्ये बेशिस्तपणा चालत नाही. कार्यकर्त्यांनी शिस्त बाळगावी,’ असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)