शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

क्षेत्रमाहुली येथे उदयनराजेंकडून कारागृहाच्या जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:38 IST

सातारा : शहरात असणाऱ्या जुन्या कारागृहाची जागा सध्या अपुरी पडू लागली आहे. त्याचबरोबर हे कारागृह शहराच्या मध्यवर्ती भागात ...

सातारा : शहरात असणाऱ्या जुन्या कारागृहाची जागा सध्या अपुरी पडू लागली आहे. त्याचबरोबर हे कारागृह शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने याचा नागरिकांना त्रास होत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बांधकाम नियम पाळावे लागत आहे. मात्र, नवीन कारागृह झाल्यानंतर नागरिकांची यातून सुटका होणार आहे. तसेच बंदिवानांना जास्त सुविधा मिळणार आहेत. नव्या कारागृह बांधकामासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

क्षेत्रमाहुली या ठिकाणी नवीन कारागृहाचे बांधकाम होणार आहे. या जागेची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. यावेळी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, कारागृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार उदयनराजे म्हणाले, सातार्‍यातील कारागृह हे ब्रिटिशकालीन आहे. गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी वाढल्याने हे कारागृह आता अपुरे पडू लागले आहे. क्षमतेपेक्षा बंदिवानांची संख्या जास्त असल्याने पोलिसांवरही ताण येऊ लागला आहे. त्यातच आता सातारा शहराची हद्दवाढ झाली आहे. कोणतेही कारागृह हे शहरापासून लांब असलेले कधीही चांगले असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने ते बरे पडते. सध्याच्या कारागृहामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास होत आहे. सुरक्षेमुळे या परिसरात असणार्‍या इमारतींची उंची वाढलेली नाही.

हद्दवाढीनंतर सातार्‍याचा विस्तार वाढणार आहे. शहराचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येत वाढ होणार असल्याने सध्याचे कारागृह हे कमी पडणार आहे. त्यामुळे बंदिवानांची सुरक्षा, सोयी-सुविधा व नागरिकांचा विचार करणे सातारा शहरासाठी नवीन कारागृहाची गरज भासणार आहे.

नवीन कारागृहाची बांधणी झाल्यानंतर जुन्या कारागृहाचा वापर संग्रहालयासाठी केला जाऊ शकतो. तसेच बांधकाम नियमांतून नागरिकांची सुटका होईल. यासाठी नवीन कारागृहाच्या बांधकामासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही उदयनराजे यांनी सांगितले.

फोटो : १० सातारा माहुली

फोटो ओळ : क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथे नव्याने होणाऱ्या कारागृहाच्या जागेची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत कारागृहाचे अधिकारीही उपस्थित होते.