शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी

By admin | Updated: March 27, 2017 22:38 IST

शासकीय विश्रामगृहावर बेदम मारहाण केल्याप्रकरणी वैभव राजाराम बोंडरे (वय २६, रा. मुरुम, ता. फलटण) याला सोमवारी अटक करण्यात आली

आॅनलाइन लोकमतसातारा, दि. 27 - लोणंद येथील सोना अलाईन्स कंपनीचे मालक राजीवकुमार जैन यांना खंडणीसाठी आणि कामगारांच्या पगारासाठी शासकीय विश्रामगृहावर बेदम मारहाण केल्याप्रकरणी वैभव राजाराम बोंडरे (वय २६, रा. मुरुम, ता. फलटण) याला सोमवारी अटक करण्यात आली. त्यामुळे अटक केलेल्यांची संख्या आठ झाली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या आठ जणांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यामधील मुख्य आरोपी व खासदार उदयनराजे भोसले यांचे पीए अशोक सावंत व रणजित माने हे दोघे प्रकृती अस्वास्थ्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल असल्याने त्यांना तीन दिवसांची मॅजेस्टिक रिमांड देण्यात आली आहे. शुक्रवार, दि. ३१ रोजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या जामीन आर्जावर सुनावणी होणार आहे.सोना अलाईन्स कंपनीचे मालक व व्यवस्थापक राजीवकुमार जैन यांनी दोन महिन्यांचे चार लाख रुपये खंडणी दिली नाही व कामगारांचे पगार केले नाहीत म्हणून रणजित माने व अशोक सावंत यांनी खासदार उदयनराजे यांनी मिटिंगसाठी बोलावले आहे, असा फोन करून जैन व त्यांच्या सहकाऱ्यांना सातारा येथील विश्रामगृहावर बोलावून घेतले होते. यानंतर जैन यांच्या सहकाऱ्यांना कोंडून जैन यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. याबाबत जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदयनराजेंसह दहा जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ९ जणांना पोलिस कोठडी मिळाली होती. त्यापैकी मुख्य आरोपी रणजित माने याला अर्धांगवायूचा झटका आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अशोक सावंत याला बीपीचा स्ट्रोक बसल्याने त्याला ही रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे सोमवारी न्यायालयात हे दोन आरोपी सोडून अन्य सात जणांना हजर करण्यात आले. या सातही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर अशोक सावंत व रणजित माने यांना तीन दिवसांची मॅजेस्टीक रिमांड देण्यात आली.