शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात राष्ट्रवादीच्या फ्लेक्सवर उदयनराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:45 IST

सातारा : राष्ट्रवादीच्या जाहीर कार्यक्रमांच्या पोस्टरवरून गायब झालेली खासदार उदयनराजे भोसले यांची छबी पुन्हा नव्याने झळकू लागली आहे. राष्ट्रवादीच्या येथे झालेल्या युवक मेळाव्याच्या फ्लेक्सवर खासदारांचे छायाचित्र लावण्यात आले होते. उदयनराजेंच्या बाबतीत राष्ट्रवादी नेत्यांचे मनपरिवर्तन झाल्याचीच ही नांदी असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.‘एक बुथ एक युथ,’ असा नारा देत राष्ट्रवादी ...

सातारा : राष्ट्रवादीच्या जाहीर कार्यक्रमांच्या पोस्टरवरून गायब झालेली खासदार उदयनराजे भोसले यांची छबी पुन्हा नव्याने झळकू लागली आहे. राष्ट्रवादीच्या येथे झालेल्या युवक मेळाव्याच्या फ्लेक्सवर खासदारांचे छायाचित्र लावण्यात आले होते. उदयनराजेंच्या बाबतीत राष्ट्रवादी नेत्यांचे मनपरिवर्तन झाल्याचीच ही नांदी असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.‘एक बुथ एक युथ,’ असा नारा देत राष्ट्रवादी युवक काँगे्रसच्या वतीने शुक्रवारी युवकांचा मेळावा झाला. या मेळाव्याला ज्येष्ठ नेते आमदार शशिकांत शिंदे, युवकचे अध्यक्ष तेजस शिंदे, सुरेश घुले, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब महामुलकर, सभापती मिलिंद कदम, राहुल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.‘उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत, ते अजूनही आमच्यासोबतच आहेत,’ असे आमदार शिंदे यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. राष्ट्रवादीच्या या ‘यूटर्न’मुळे उदयनराजेंबाबत पक्षांतर्गत वातावरण ‘सॉफ्ट’ झाले आहे, असा समज अनेकजण करून घेऊ लागले आहेत. मेळाव्याच्या स्टेजच्या मागे लावलेल्या फ्लेक्सवर सर्व नेत्यांची छायाचित्रे होती, त्यामध्ये उदयनराजेंनाही स्थान मिळाले.मोदी सरकारच्या निर्णयांमुळे गेल्या तीन वर्षांमध्ये प्रत्येक घरावर संकट कोसळले आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचारी भरती करण्याची घोषणा केली; पण ती कशी फसवी होती, हे दोनच दिवसांत उघडकीस आले. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. तर दुसºया बाजूला उद्योग व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. या अन्यायाविरोधात मोठे आंदोलन उभे करावे लागणार आहे. आंदोलनात किती कार्यकर्ते येतील, याचा विचार न करता अन्याय दिसेल तिथे आंदोलनास सिद्ध राहावे, असे आवाहनही आ. शिंदे यांनी केले.मेळाव्याकडे आमदारांची पाठराष्ट्रवादी युवकच्या मेळाव्याला आमदार शशिकांत शिंदे हे उपस्थित राहिले. पक्षाच्या इतर आमदारांनी मात्र या मेळाव्याकडे पाठ फिरविली. जिल्हाधिकारी कार्यालयापुढेही युवकचे आंदोलन झाले. त्या आंदोलनातही आमदार मंडळींनी सहभाग नोंदवला नाही. आमदार शिंदे हे मात्र आपल्या पुत्राला पाठबळ देण्यासाठी धडाडीने प्रयत्न करत असल्याचेच यावेळी जाणवले. यापूर्वीही साताºयात युवकचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता, त्याकडेही आमदार मंडळींनी पाठ फिरवली होती, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होती.