शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दोन युवक ठार

By admin | Updated: March 27, 2016 00:16 IST

एक जखमी : नागठाणेजवळ टायर बदलताना ट्रकची धडक

सातारा : जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत दोनजण ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. नागठाणे येथील अपघात टायर बदलताना ट्रकने धडक दिल्याने चरण सदाशिव पाटील (वय १९, रा. धामणी, ता. तासगाव) हा युवक ठार झाला, तर पाचगणी येथे दुचाकी घसरून वैभव अरुण कांबळे (१८, आंबेडकर कॉलनी, पाचगणी) या युवकांचा मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे, टेम्पोचालक सूरज अशोक पाटील व चरण पाटील (दोघे रा. धामणी, ता. तासगाव) हे दोघे कोल्हापूरहून पुण्याकडे निघाले होते. शुक्रवारी रात्री त्यांचा टेम्पो नागठाणेजवळ पंक्चर झाला. त्यामुळे टायर बदलण्यासाठी दोघेही खाली उतरले. काही वेळानंतर टायर बदलून झाला. जुना टायर ट्रकमध्ये ठेवण्यासाठी चरण पाटील हा घेऊन जात असताना दुसऱ्या ट्रकने चरण आणि सूरजला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, चरण पाटील जागीच ठार झाला, तर सूरज गंभीर जखमी झाला. काही नागरिकांनी जखमी सूरजला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. ज्या ट्रकने धडक दिली. त्या ट्रकचा चालक वैजनाथ कदम (रा. बार्शी, जि. सोलापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी) पाचगणीत दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू पाचगणी : वैभव कांबळे हा शुक्रवारी (दि.२५) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पाचगणीहून सेंट झेविअर्स हायस्कूलकडे दुचाकीवरून (एमएच ११ बी आर ६६३८) निघाला होता. सेंट झेविअर्स हायस्कूलजवळील वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी भिंतीवर आदळली. त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला; मात्र अपघात झाल्याचे कुणालाही न समजल्याने वैभव त्या ठिकाणी बराच वेळ पडून होता. काही वेळानंतर तेथील नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वैभवने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती.