शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नांदवळ येथे दुचाकींची धडक; दोन जागीच ठार

By admin | Updated: April 26, 2017 23:29 IST

नांदवळ येथे दुचाकींची धडक; दोन जागीच ठार

वाठार स्टेशन : सोळशी-वाठार रस्त्यावर नांदवळनजीक (ता. कोरेगाव) झालेल्या दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोनजण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी दुपारी दोन वाजता झाला.समीर राजेंद्र कांबळे (वय १९, रा. सोळशी, ता. कोरेगाव), सुशील जनार्दन डेरे (४०, रा. सर्कलवाडी, ता. कोरेगाव) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, समीरची चुलती नंदा वसंत कांबळे व चुलत भाऊ सुशील वसंत कांबळे हे पिंपोडे येथील खासगी दवाखान्यात अ‍ॅडमिट होते. त्यांना दुपारी घरी सोडण्यात येणार होते. दवाखान्याचे बिल भरण्यासाठी पाचशे रुपये कमी पडत असल्याने समीर पैसे घेऊन पिंपोड्याकडे दुचाकीवरून निघाला होता. त्याचवेळी इलेक्ट्रिक फिटिंगची कामे करणारे सुशील डेरे हे त्यांच्या दुचाकीवरून सोळशीकडे निघाले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नांदवळ गावच्या हद्दीत थड्याच्या चौकापासून पुढे दोनशे मीटर अंतरावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघेही उंच उडून बाजूला फेकले गेले. त्यात समीर व सुशील यांच्या कपाळाला गंभीर जखम झाली. दोघेही रक्तबंबाळ झाले. त्यांना पिंपोडे येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच दोघेही मृत्युमुखी पडले होते. समीर एकुलता एक होता, त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्याचे वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याने तो कॉलेजमध्ये शिकत सुटीत कामाला जात होता. तर सुशील यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली व वडील असा परिवार आहे. अपघाताचे वृत्त समजल्यावर दोघांच्याही नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयात आक्रोश केला. दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. सायंकाळी पाच वाजता मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. (वार्ताहर)तीव्र उतार जीवघेणा प्रवास!या परिसरात सातत्याने अपघात होत आहेत. तीव्र उतारावर असलेल्या वळणामुळे व चौकामुळे वेगात येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. दोन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे अपघात झाला होता. त्यामध्ये एकजण जागीच ठार झाला होता. वारंवार जीवघेणे अपघात होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीच उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.