सातारा : येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयासमोर असणाऱ्या एका रुग्णालयाच्या जवळून दुचाकी चोरून नेण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झालेला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी मनोहर वसंत भोसले (वय ५९, रा. भोळेवाडी, ता. कऱ्हाड) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा ते ११ च्या दरम्यान अज्ञाताने दुचाकी (एमएच ५०, एच ४३५७) बनावट चावी किंवा हँडल लॉक तोडून नेली. याप्रकरणी १२ ऑगस्ट रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार मोहिते हे दुचाकी चोरीचा तपास करीत आहेत.
.................................................