शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांतून निघणार दोन हजार ट्रॉली गाळ...

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

कातरखटाव : लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान; सावली फाउंडेशनचा पुढाकार

विठ्ठल नलवडे -- कातरखटाव  तालुक्यातील कातरखटाव येथे ‘जलयुक्त शिवार’ अभियानाच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. लोकसहभागातून व सावली फाउंडेशनच्या पुढाकारातून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, सिमेंट बंधारे, ओढ्यातील गाळ काढण्याबरोबर विहीर पुनर्भरणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान, येथील तीन बंधाऱ्यांतून सुमारे दोन हजार ट्रॉली गाळ निघणार आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढीस मोठी मदत होणार आहे. सध्या कातरखटाव गावाजवळ असणाऱ्या एका बंधाऱ्यातून गाळ काढण्यात येत आहे. तसेच बंधाऱ्याची गळती काढून उंची दोन फू ट वाढविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे बंधाऱ्यात भरपूर पाणीसाठा तसेच येत्या पावसाळ्यात पाणी मुरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या परिसरातील विहिरी, बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळणार आहे. तसेच इतर दोन बंधाऱ्यातीलही लवकरच गाळ काढण्यात येणार आहे या ‘जलयुक्त शिवार’अभियान कार्यक्रमाच्या वेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, खटावचे तहसीलदार विवेक सांळुखे, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, मंडल कृषी अधिकारी बी. एच. दाभाडे, कृषी सहायक यू. एन. चिकुटे, सरपंच तानाजीशेठ बागल, उपसरपंच संतोष बागल, ग्रामसेवक आर. व्ही. अहिरेकर, डॉ. आकाराम बोडके, प्रशांत पाटील, अध्यक्ष बाळासाहेब पाटील, अजित सिहांसने, पोपट बागल, जयकुमार बागल व ग्रामस्थ उपस्थित होते. ‘पाणीटंचाईवर मात करण्यासाठी व जलयुक्त शिवार कामामध्ये गावातील सर्व लोकांचा सहभाग दिसून आला पाहिजे, असे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सांगितले.शेतकऱ्यांकडून गाळाची वाहतूक...कातरखटावची ‘जलयुक्त शिवार’ अभियानअंतर्गत निवड करण्यात आल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच येथील एका बंधाऱ्याचे आठ दिवस काम चालणार आहे. सध्या दिवसाला शंभर ट्रॉली गाळ उचलला जात असून, आठ दिवसांत हजार ते बाराशे ट्रॉली गाळ निघणार आहे. येथील सर्व तीन बंधाऱ्यांतून सुमारे दोन हजार ट्रॉलींच्यावर गाळ निघणार आहे. सध्या येथील गाळ शेतकरी घेऊन जात आहेत. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढणार आहे.