शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारांचा वापर बिले मात्र अडीचशे

By admin | Updated: December 3, 2015 23:52 IST

वीजवितरणचा कारभार : दोन महिन्यांपासून मीटरचे फोटो गायब

सातारा : कोणत्याही शासकीय यंत्रणेचे खासगीकरण झाल्यानंतर काय होऊ शकते, याचा प्रत्येय सध्या जिल्ह्यातील वीजग्राहक घेऊ लागले आहेत. जिल्ह्यातील काही भागात अतिशय कमी वापर झालेला असताना २५ ते ३० हजारांपर्यंत वीजबिल आकारण्याची करामत केली आहे. सातारा परिसरातील काही भागातील ग्राहकांना मात्र भलताच अनुभव येऊ लागला आहे. दरवेळचे सरासरी वापर हजार दोन हजार असताना केवळ दोन ते चार रुपयांची बिले दिली आहेत. बिलावरून मीटर युनिट रिडिंगचा फोटोही गायब झाला आहे.वीज बिलातील घोटाळे हे नवीन नाहीत. अनेक भागांत प्रमाणापेक्षा जास्त बिल येत असल्याची तक्रारी ग्राहकांतून येत आहेत. बिल जास्त आले म्हणून ते लवकर भरत नाहीत. बिल भरले नाही म्हणून जोडणी कट केली जाते. त्यामुळे ग्राहकांचा संताप अनावर होतो. एकदा आलेले बिल कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागतात. ते त्यांच्या अधिकारात कमी करून देतात; मात्र उर्वरित रक्कम पुढच्या बिलात आकारली जाते. या सर्व तक्रारींचा विचार करून वीजवितरण कंपनीने काही वर्षांपूर्वी पथदर्शी उपक्रम राबविला होता. कंपनीचे खासगीकरण झाल्यानंतर मीटर युनिट रिडिंग, बिलांचे वाटप यासाठी ठेकेदार नेमले आहेत. रिडिंग घेताना मीटरचे फोटो घेऊन येतील. रिडिंग युनिटचा फोटोच बिलावर प्रसिद्ध झाल्याने तक्रारी कमी होतील व कामात सुसूत्रता येण्याची आशा निर्माण झाली होती. सातारा शहरापासून काही अंतरावर असलेल्या दरे बुद्रुक परिसरातील अनेक ग्राहकांच्या बिलाचे दोन महिन्यांपासून रिडिंगच झालेले नाही. दरवेळी फोटोचा रकाना रिकामा येत आहे. त्यामुळे सरासरी बिल आकारले जात आहे. ज्यांचा दरमहिन्याचा सरासरी वापर दीड ते दोन हजार रुपये येत आहेत, त्यांना अवघे दोनशे रुपयांचे बिल दिले आहे. (प्रतिनिधी)सर्वच ग्राहकांच्या विद्युत मीटरचे फोटो रिडिंग घेणे बंधनकारक आहे. अपवादात्मक परिस्थितीत घर बंद असेल तर रिडिंग घेता येत नाही. तरीही यासंदर्भात अशा घटना घडल्या असल्यास तत्काळ रिडिंग घेतले जाईल. त्या आशयाच्या सूचना संबंधित विभागाला केल्या जातील.- सुरेश गणेशकर --अधीक्षक अभियंता, वीज वितरण कंपनी, सातारासहन करावा लागणार भुर्दंडखासगी ठेका दिल्याने ग्राहक कोणालाही बोलू शकत नाहीत. विचारले असता ‘घर बंद असल्याने रिडिंग घेतले नाही’ हे कारण सांगितले जाते. मात्र, एक-दोन महिन्यांनी मागचे सर्व रिडिंगचा वापर दाखविला जाणार आहे. त्यावेळी मागील सर्व बिल एकदम भरावे लागणार आहे. बिल न भरल्यास जोडणी तोडण्यास पुढचा विभाग सज्ज आहेच.