शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात १२ तासांत दोन राडे

By admin | Updated: March 19, 2015 00:01 IST

नऊ जणांवर गुन्हा : राधिका चौकात नाचविल्या नंग्या तलवारी

सातारा : शहरात मंगळवारी रात्रीपासून दोन ठिकाणी बाचाबाची, शिवीगाळ आणि हाणामारीच्या घटना घडल्या. राधिका चौकात रात्री तलवारी, कोयते अशी धारदार शस्त्रे नाचविली गेल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले, तर शाहू चौकात युवकांमध्ये मारामारी झाली. या दोन्ही प्रकरणांत नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.राधिका चौकातील घटनेसंदर्भात पोलीस हवालदार मोहन चव्हाण यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून मंगळवारी रात्री साडेनऊनंतर तरुणांचा एक गट शस्त्रास्त्रे घेऊन या चौकात दाखल झाला आणि मोठमोठ्याने आरडाओरडा करून तणाव निर्माण केला. कोयता, तलवार अशी शस्त्रे या युवकांच्या हातात होती. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी विक्रम दिलीप साठे, शैलेश सुरेश जाधव, सागर शिंदे, संतोष कांबळे आणि नवनाथ पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुधवारी सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान आनंदवाडी दत्तमंदिराजवळील शाहू चौकात तरुणांमध्ये मारामारी झाली. यावेळी चौकात बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. काही कारणांवरून तरुणांमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर अचानक हाणामारी सुरू झाली. चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती आटोक्यात आणली. पोलीस हवालदार रामचंद्र पवार यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार नाना केशव केदारी (रा. पुणे), अक्षय सयाजी सपकाळ (रा. कऱ्हाड), अविनाश सुनील घोरपडे आणि महेश विजय परदेशी (रा. सातारा) यांच्याविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी तणाव निर्माण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांमुळे सातारासारख्या शांत समजल्या जाणाऱ्या शहरात भलताच तणाव निर्माण झाला होता. गर्दीच्या ठिकाणी अशा घटनांमुळे मोठा अनर्थ घडू शकणार असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक बनले आहे. (प्रतिनिधी)