शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या ट्रॉलीला कारची धडक बसून दोघेजण ठार

By admin | Updated: December 22, 2016 23:08 IST

एक गंभीर : वाठारनजीक चालकाचा ताबा सुटून दुर्घटना

मलकापूर : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला कारची पाठीमागून धडक बसली. या अपघातात कारमधील दोघे जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील वाठार हद्दीत गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.लक्ष्मण सावजी बंडलकर (वय ३९ ), संजय मारुती बसरी (दोघेही, रा. उंब्रज, मूळ रा. बेळगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत, तर सुभाष मल्लेश केदारजी (रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) असे गंभीर जखमीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासेगावहून ऊस भरून एक ट्रॅक्टर ट्रॉली (एमएच २६ ७७२०) गुरुवारी पहाटे वाठारकडे येत होता. तो पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आला असताना कोल्हापूरहून कऱ्हाडच्या दिशेने जात असलेल्या कारवरील (एमएच ५० ए ६८३ ) चालकाचा ताबा सुटून कारची उसाने भरलेल्या ट्रॉलीला धडक बसली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. अपघातात कारमधील बंडलकर व बसरी हे दोघे जागीच ठार झाले, तर सुभाष केदारजी हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस मदत केंद्र्राचे सहायक पोलिस निरीक्षक अजित सिद यांच्यासह पोलिस कर्मचारी, महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघाताची खबर कऱ्हाड तालुका पोलिसांना देण्यात आली. कऱ्हाड तालुका पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा करून महामार्ग वाहतुकीस खुला केला. (प्रतिनिधी)ट्रॅक्टरचालक पसारकारची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसून कारचा चक्काचूर झाला; मात्र पहाटेची वेळ असल्याने परिसरात कोणीही नव्हते. संबंधित ट्रॅक्टरचालकाने खाली उतरून कारची अवस्था पाहिली. त्यावेळी इतर वाहनेही अपघातस्थळापर्यंत पोहोचली होती. मात्र, अपघाताची भीषणता पाहिल्यानंतर ट्रॅक्टरचा चालक तेथून पसार झाला. रात्री उशिरापर्यंत तो पोलिसांत हजर झाला नव्हता.