शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शपथविधीसाठी दोघे वृद्ध शेतकरी दुचाकीवरून मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 23:52 IST

शंकर पोळ । कोपर्डे हवेली : गत आठवड्यापासून सतत घडत असलेल्या राजकीय घडामोडी हा ग्रामीण विभागातील ग्रामस्थांचा चर्चेचा विषय ...

शंकर पोळ ।कोपर्डे हवेली : गत आठवड्यापासून सतत घडत असलेल्या राजकीय घडामोडी हा ग्रामीण विभागातील ग्रामस्थांचा चर्चेचा विषय ठरला होता. अखेर सरकार स्थापन होऊन गुरुवारी हा शपथविधी मुंबई येथील शिवतीर्थावर संपन्न झाला. त्यासाठी कोपर्डे हवेली येथील वृद्ध सामाजिक कार्यकर्ते मोहनराव चव्हाण आणि डॉ. दस्तगीर सुतार हे चक्क दुचाकीवरून मुंबईला गेले. शपथविधी सोहळ्याला त्यांनी उपस्थिती लावली.कोपर्डे हवेलीतील सिद्धनाथ मंदिरासमोरची गुरुवारची सकाळची वेळ. त्याठिकाणी गप्पा मारत बसलेल्या ग्रामस्थांमध्ये शपथविधी सोहळ्याची चर्चा सुरू होती. रंगलेल्या चर्चेत मोहनराव चव्हाण, डॉ. दस्तगीर सुतार हे दोघेही सहभागी झाले. कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, श्रीकांत पाटील, अप्पासाहेब चव्हाण आदींसह इतर ग्रामस्थही त्याठिकाणी होते.सामजिक कार्यकर्ते मोहनराव चव्हाण व डॉ. दस्तगीर सुतार या दोघांचेही वय ७० वर्ष आहे. तसेच हे दोघेही वर्गमित्र आहेत. त्यांचे वय पाहता इतरांनी त्यांना दुचाकीवरून जाण्यापेक्षा इतर वाहनांनी मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याला नकार देत मोहनराव चव्हाण म्हणाले, ‘आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे आहोत. आम्ही या वयातही दुचाकीवरून जाणारच.’ ग्रामस्थांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण कोणाचेही न ऐकता मोहनराव चव्हाण आणि डॉ. दस्तगीर सुतार हे मुंबईला दुचाकीवरून रवाना झाली. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कोपर्डे हवेलीतून दुचाकीवरून त्यांचा सुरू झालेला हा प्रवास रात्री साडेसात वाजता शपथविधी सोहळ्यापर्यंत जाऊन पोहोचला.