सातारा : जिल्ह्यात रविवारी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ८३० वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असून, रविवारी रात्री ६७ रुग्ण आढळून आले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पुसेसावळी (ता. खटाव) येथील ६५ वर्षीय महिला, घाडगेमळा (ता. फलटण) येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
दरम्यान, रविवारी दिवसभरात ४ नागरिक, तर आत्तापर्यंत ५४ हजार २२९ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तसेच ९ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत बाधितांची संख्या ५६ हजार ९८७ इतकी झाली आहे. त्याचबरोबर गत काही दिवसांपासून तपासणीसाठी रुग्णालयात गर्दी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.