लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ८२४ वर पोहोचली आहे. तसेच नवे ६४ बाधित रुग्ण आढळून आले असून, बाधितांचा आकडा ५६ हजार ८३५ इतका झाला आहे.
जिल्ह्यात गत चार आठवड्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, गुरुवारी रात्री ६४ रुग्ण आढळून आले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नांदवर येथील ६७ वर्षीय पुरुष तसेच येराळवाडी, ता. खटाव येथील ६९ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात ३० नागरिक तर आतापर्यंत ५४ हजार १६५ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तसेच ३६१ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचबरोबर गत काही दिवसांपासून तपासणीसाठी रुग्णालयात गर्दी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.