वाई पोलीसांनी केेलेल्या कारवाईमध्ये दिलीप बाबुराव मोहिते (५०), अक्षय दिलीप मोहिते (२३, दोघेही रा.पिंपोडे बु. ता. कोरेगाव), वसंत दिनकर सपकाळ (५०, रा. धावडी ता. वाई), भिकाजी जगन्नाथ सूर्यवंशी (३४, रा. भालेकर ता. वाई) व प्रशांत भीमराव शिंदे (४४, शिरगाव ता. वाई) यांना यापूर्वी ताब्यात घेतले असून त्यांना न्यालयालयीन कोठडी मिळाली होती. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता. आणखी दोन साथीदारांची नावे उघड झाली. यामध्ये मयूर सतीश केंजळे (रा. पिंपोडे ) आणि सुशांत विजय शेलार (रा. राऊतवाडी ता कोरेगाव ) यांना ताब्यात घेऊन सातही आरोपींना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून असे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तविली. या कारवाईत वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य रोहन भाटे, भरारी पथक वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, वाईचे वनक्षेत्रपाल महेश झाझुर्णे, गणेश महांगडे, वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दीपक गायकवाड, विजय भोसले, पोलीस कॉन्स्टेबल राजेश वीरकर, सुहास पवार, दिनेश नेहरकर यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी सहभागी होते.