शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांपासून ग्रामस्थांचा घसा कोरडा

By admin | Updated: February 18, 2015 23:45 IST

आवळेपठार, गारवडीत पाणीटंचाई : टॅँकर सुरू करण्याबाबत प्रशासन मात्र उदासीन

केशव जाधव - पुसेगाव   आवळेपठार, गारवडी, ता. खटाव येथे गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची लेखी मागणी जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, प्रशासन एकमेंकाकडे बोटे दाखवत टोलवाटोलवी करत आहे. पिण्याचा टँकर तत्काळ सुरू न झाल्यास या निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.गारवडी, ता. खटाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आवळेपठार वस्ती आहे. ही वस्ती ही खटाव-माण तालुकांच्या डोंगरावर असून, याठिकाणी सुमारे १५० ते १७५ लोकसंख्या आहे. याठिकाणी सामुदायिक विहीर आहे, जून ते डिसेंबर या कालावधीत या विहिरीत छोटी मोटार टाकून सुमारे १० ते १५ हजार लिटर क्षमतेच्या असलेल्या टाकीत पाणी साठवले जाते. येथूनच सर्व ग्रामस्थ पाणी नेत असतात. गेल्या दोन महिन्यांपासून आवळेपठार येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावा, यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, प्रांत, खटाव-माण तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी मागणी केली. मात्र, आवळेपठार हे खटाव हद्दीत येत असले तरी त्याला रस्ता हा माण तालुक्यातून आहे. पिण्याच्या पाण्याचा तत्काळ टँकर सुरू करून पाणी टंचाई दूर करावी, याकरिता प्रशासन कार्यालयामध्ये वेळोवेळी गेल्यानंतर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडून टोलवाटोलवी व उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्रामस्थांना वेठीस धरत आहेत तसेच दुष्काळग्रस्त जनतेच्या भावनांशी खेळत आहेत. पाणी टॅँकर सुरू न केल्यास या निष्क्रिय प्रशासनाच्या कारभारा विरोधात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. अधिवेशनात आवाज उठविणार : शिंदेआवळेपठार येथे गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. येथील महिला व ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. म्हणूनच स्वखर्चाने पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू केला आहे. मात्र, पाणी टंचाईच्या काळातही जिल्ह्यातील प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत कामात हालगर्जीपणा करत आहे. यासंदर्भात विधानसभेच्या यार्च अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले.