शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत १३ कोटी वसूल !

By admin | Updated: March 25, 2016 00:06 IST

टार्गेटला दोन कोटी बाकी : सुटीच्या दिवशीही पालिकेचे कर्मचारी कामावर

सातारा : थकबाकीदारांकडून यंदा पालिकेने विक्रमी थकबाकी वसूल केली असून, केवळ दोन महिन्यांत तब्बल १३ कोटी पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. सध्या सलग सुट्या असतानाही पालिकेतील सुमारे ३५ अधिकारी व कर्मचारी कामावर हजर आहेत. नेहमीप्रमाणेच वसुली आणि संगणक विभाग गुरुवारी कार्यरत होता.घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकीदारांची संख्या यंदा जास्त आहे. त्यामुळे वीस कोटींहून अधिक रकमेची थकबाकी वसूल करणे पालिकेसमोर मोठे आव्हान होते. फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यातच वसुली मोहीम सुरू झाली होती. जप्ती पथक दारात आल्यानंतर अनेकांची चांगलीच तंतरू लागली. त्यामुळे थकबाकीदारांनी वसुली पथक दारात आल्यानंतर लगेच थकबाकी जमा केली. बड्या धेंड्यांकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप वसुली विभागावर झाला; मात्र वसुली विभागानेच अशा आरोपांकडे कानाडोळा करून आपली मोहीम सुरूच ठेवली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पायाला भिंगरी बांधून वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. एका दिवसात तब्बल दहा लाख रुपये वसूल करण्याचा विक्रमही सातारा पालिकेने आपल्या नावावर केला आहे. ही मोहीम सुरू होऊन दोन महिने पूर्ण होण्यापूर्वीच तब्बल १३ कोटींची थकबाकी वसूल करण्यात पालिकेच्या वसुली विभागाला यश आले आहे. परंतु अद्यापही काही जणांकडे मोठ्या रकमेची थकबाकी आहे. अशा लोकांकडे रोज पाठपुरावा करून थकबाकी वसूल केली जात आहे. सध्या सलग चार दिवस सुट्या असतानाही या कर्मचाऱ्यांनी सुट्या घेतल्या नाहीत. नेहमीप्रमाणेच कामावर येऊन वसुलीची मोहीम सुरू ठेवली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये ठरविण्यात आलेले वसुलीचे टार्गेट पूर्ण होण्यास आता दोन कोटी बाकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, एप्रिल महिन्यामध्ये घरपट्टीधारकांच्या हरकती येणार आहेत. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आणखी थकबाकी चांगली वसूल होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांना आहे. (प्रतिनिधी)उद्दिष्ट पूर्ण होईलवसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आमचे सर्व अधिकारी व कर्मचारी सुटीच्या दिवशीही कामावर हजर आहेत. येत्या काही दिवसांत उर्वरित दोन कोटींची थकबाकीही वसूल होईल.- अंबादास वणवे, वसुली अधीक्षक, सातारा पालिका