शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

दोन आमदारांनी साधला तीन तालुक्यांचा बॅलन्स!

By admin | Updated: March 15, 2017 22:47 IST

पदाधिकारी निवडी : सातारा, जावळी, कोरेगाव विधानसभा मतदार संघांना संधी

सागर गुजर ल्ल साताराआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा तालुक्याच्या सभापती व उपसभापतिपद निवडताना तीन तालुक्यांचा बॅलन्स साधल्याचे स्पष्ट दिसते. आगामी विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना म्हणूनही या निवडीकडे पाहिले जात आहे. सातारा पंचायत समितीमध्ये २० पैकी ११ जागा जिंकून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद सत्ता मिळविली आहे. भारतीय जनता पक्षाला सोबत घेणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या हाती ९ जागा लागल्या. सभापती व उपसभापतिपद आमदार गटाकडेच जाणार, हे स्पष्ट होते, पण तरीही खासदार गटाने या निवडीत आपले नशीब आजमावले. आमदार गटाची मते फुटू शकली नाहीत, त्यामुळे पर्यायाने आमदार गटाकडेच सभापती व उपसभापतिपद राहिले आहे. सातारा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदासाठी मंगळवारी मतदान झाले. यामध्ये सभापतिपदी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटातील मिलिंद कदम तर उपसभापतिपदाची माळ जितेंद्र सावंत यांच्या गळ्यात पडली. सभापतिपदासाठी राष्ट्रवादीतर्फे खेड गणातून मिलिंद कदम यांनी दोन अर्ज दाखल केले होते. तर शेंद्रे गणातून राष्ट्रवादीच्या छाया कुंभार यांनी एक तर सातारा विकास आघाडीतून दरे खुर्द गणातील हणमंत गुरव यांनी अर्ज दाखल केले. तर उपसभापतिपदासाठी लिंब गणातून जितेंद्र सावंत यांनी राष्ट्रवादीतून दोन अर्ज दाखल केले. तर सातारा विकास आघाडीचे कोडोली गणातील रामदास साळुंखे यांनी अर्ज भरला होता. सभापतिपदासाठी दाखल केलेल्या छाया कुंभार यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणूक रिंगणात प्रत्येकी दोन अर्ज राहिल्याने मतदान घ्यावे लागले. पंचायत समितीच्या सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. यामध्ये सभापतिपदासाठी आमदार गटाचे कदम यांना अकरा तर खासदार गटाचे हणमंत गुरव यांना नऊ मते पडली. सभापतिपदावर कोरेगाव विधानसभा मतदार संघातील मिलिंद कदम यांची निवड झाली असल्याने उपसभापतिवर सातारा-जावळी विधानसभा मतदार संघातील जितेंद्र सावंत यांची निवड केली गेली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत पाच वर्षे सदस्य असलेले जितेंद्र सावंत यांना लिंब गट आरक्षित झाल्याने पंचायत समितीची निवडणूक लढवावी लागली होती. पंचायत समितीचे सभापतिपदही आरक्षित असल्याने सावंत यांना उपसभापतिपदावर संधी देण्यात आली. हे पद अडीच वर्षांसाठी ठेवले जाणार याची उत्सुकता आहे. सभापतिपद हे अडीच वर्षे कदम यांच्याकडेच राहणार असल्याने उपसभापतिपद बदलाचा निर्णयही अडीच वर्षांनंतरच होऊ शकतो. आमदारांकडून बेरजेचे राजकारणलिंब हे सातारा तालुक्यातील मोठे गाव आहे. राजकीयदृष्ट्या या गावाने आमदारांना साथ दिली आहे. भविष्यात हे गाव आपल्या पाठीशी राहील, या बेरजेच्या राजकारणातून लिंबच्या जितेंद्र सावंत यांना उपसभापतिपदावर संधी दिली गेली आहे.