शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा च्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

By admin | Updated: April 27, 2017 21:49 IST

कृष्णा कारखान्यातील बोगस कर्जप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना कऱ्हाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. बुधवारी रात्री उशिरा

 आॅनलाईन लोकमतकऱ्हाड, दि. 27 -  कृष्णा कारखान्यातील बोगस कर्जप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना कऱ्हाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. दोघांनाही न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दामाजी कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक नलवडे यांनाही गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनाही दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.राहुल हिंदुराव देसाई (रा. शिरटे, ता. वाळवा) व संभाजी सीताराम भंडारे (रा. कोळेवाडी, ता. कऱ्हाड) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. कृष्णा कारखान्यातील बोगस कर्ज प्रकरणाच्या आरोपावरून यापूर्वीच माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. १५ एप्रिल रोजी पोलिसांनी याप्रकरणी कऱ्हाडसह वाळवा तालुक्यात माजी संचालकांच्या घरांवर एकाचवेळी छापे टाकले. त्यावेळी आठजण पोलिसांच्या हाती लागले. संबंधित आठजणांना पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता चौघांना पोलिस प्रक्रिया राखून ठेवून प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर चौघांना दि. १८ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानंतर कोठडीची मुदत संपल्याने संबंधित आठही माजी संचालकांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी यापूर्वी न्यायालयीन कोठडी सुनावलेल्यांना दि. २१ पर्यंत पोलिस कोठडी तर इतरांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.काही दिवसांपूर्वी या प्रकरणात कृष्णा कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक व सध्या दामाजी कारखान्यात कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत असलेल्या अशोक नलवडे यांना अटक करण्यात आली. त्यांनाही प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. बुधवारी रात्री याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.