शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात झुंजणार दोनशे संघ!

By admin | Updated: January 20, 2016 00:48 IST

स्पर्धेचे पंधरावे वर्ष : विद्युत झोतात टेनिस चेंडू क्रिकेट सामने रंगणार

सातारा : येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात १ फेबु्रवारीपासून सुमारे दोनशे संघ झुंजणार आहेत. विद्युत प्रकाशझोतात होणार असलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील रोमांचक लढती पाहण्यासाठी साताऱ्यातील क्रिकेटरसिकांना उत्सुकता लागली आहे.ही स्पर्धा एक तपापासून सुरू असून, एक महिना चालणार आहेत. विद्युत प्रकाशझोतातील स्पर्धा हा सातारकरांबरोबरच पश्चिम महाराष्ट्रासाठी नवीन होता. त्यावेळी माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, माजी नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, ज्येष्ठ क्रीडा संयोजक सुरेश साधले यांच्या संकल्पनेतून २००१ मध्ये कल्पनाराजे भोसले यांच्या आशीर्वादाने व खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठबळामुळे या स्पर्धांना प्रत्यक्ष सुरुवात झाली.स्पर्धेत सातत्य राखण्यासाठी माजी नगरसेवक दिवंगत गोपाळराव औताडे, माजी उपनगराध्यक्ष दिवंगत संजय जोशी, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक दिवंगत सुधीर माजगावकर तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुधाकर शानभाग, विद्यमान नगरसेवक बाळासाहेब बाबर, कन्हय्यालाल राजपुरोहित, किशोर शिंदे, इर्षाद बागवान, चकोर देशमुख, धनंजय जाधव, नगरसेवक भालचंद्र निकम, कोच मयूर कांबळे, प्रसाद दिवेकर, पप्पू नारकर, शिवाजी वेलणकर, किरण तोडकरी, धर्मेंद्र निकम, राहुल कवितके प्रयत्न करत आहेत.स्पर्धेचे उद्घाटन १ फेबु्रवारीला शाहू स्टेडियममध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. तर बक्षीस वितरण २४ फेबु्रवारीला होणार आहे. अधिक माहितीसाठी बाळासाहेब ढेकणे, सुरेश साधले, इर्शाद बागवान, किशोर शिंदे, चकोर देशमुख, धनंजय जाधव, राहुल कवितके, धर्मेंद्र निकम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)श्री. छ. प्रतापसिंह ऊर्फ दादा महाराज चषक स्पर्धेसाठी १ लाख १० हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. यामध्ये अनुक्रमे ५५ हजार व चषक, ३३ हजार व चषक, उपान्त फेरीत पराभूत होणाऱ्या संघांना २२ हजारांचे विभागून प्रोत्साहनात्मक रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू, सामनावीर अशी वैयक्तिक पारितोषिक देण्यात येतील.