शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पाचगणीहून महाबळेश्वरला जाण्यासाठी तब्बल दोन तास

By admin | Updated: October 26, 2014 23:25 IST

कुठे नेऊन ठेवला महाबळेश्वर माझा : मोठे उत्पन्न मिळून सुविधा पुरविण्यात अपयश

महाबळेश्वर : सातारा जिल्ह्यातील पाचगणी आणि महाबळेश्वर ही दोन शहरे थंड हवेची ठिकाणे म्हणून जगात नावारूपास आली आहेत. दोन शहरातील अंतर केवळ १९ किलोमीटर. मात्र, रस्ता खराब असल्याने तसेच वाहनांची कोंडी वाढल्याने पाचगणीहून महाबळेश्वरला येण्यास तब्बल दीड ते दोन तास लागत आहेत. पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते, तरीही त्यांना सुविधा देण्यात अपयश आल्याने ‘कुठे नेऊन ठेवलाय महाबळेश्वर माझा’ असा प्रश्न स्थानिकांतून विचारला जात आहे.महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात सलग सुटी साजरी करण्यासाठी लाखो पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. त्यांच्याकडून महाबळेश्वर शहरात प्रवेश करताच त्यांच्याकडून पर्यटक कर घेतला जातो. त्यांना प्रतिमाणूस कर घेऊन तशा पावत्याही दिल्या जातात. त्याचप्रमाणे वाहनतळासाठीही पैसे घेतले जातात. मात्र, त्यांना त्या प्रमाणात सुविधा पुरविण्यात प्रशासन यंदा अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाचगणीपासून महाबळेश्वरपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे लांबचलाब वाहनांच्या रांगा लागत आहेत. शहरातील कर नाक्यावरही रांगा लागलेल्या आहेत. तसेच शहरातील सिग्नल यंत्रणाही बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे बाहेरील पर्यटकांना वाहने चालविताना अडचणी येत होत्या. येथील सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी होत आहे.सातारा शहरातून पोलिसांना मदतीसाठी बोलाविले जातात. यावेळी हंगामाचे चार दिवस होऊनही शहरात केवळ आठ-दहा कर्मचारी दिसत आहेत. महाबळेश्वर पोलिसांवरही ताण येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर निघत आहेत. जगभरातून येत असलेल्या पर्यटकांना चांगल्या सुविधा न पुरविल्यास महाबळेश्वरविषयी चुकीचा संदेश बाहेर जाऊ शकतो. पर्यटकांना ‘अतिथी देवो भव:’ समजून स्थानिक नागरिक त्यांची सेवा करत असला तरी प्रशासनाने चांगल्या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)